...या कारणामुळे ग्रामस्थांनी दोन रात्री काढली होती जागून; मात्र आता मिळाला दिलासा

nimn ganga project in khamgaon.jpeg
nimn ganga project in khamgaon.jpeg

पोरज (जि.बुलडाणा) : खामगाव तालुक्यातील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प दोन निमकवळा येथे ११८१ हेक्टर मध्ये १०.८२ दलघमी पाणी क्षमता असलेला हा नव्याने झालेला प्रकल्प आहे. बळीराजासाठी ज्ञानगंगा नदी दुथळी भरून वाहत असल्याने अल्हाददायी दिलासा मिळाला आहे व खामगाव औद्योगिक क्षेत्र पाणीपुरवठा योजनेकरिता आणि ग्रामीण भागातील निमकवळा, पोरज, तांदुळवाडी, काळेगाव, ढोरपगाव, वर्णा, दिवठाणा, रोहणा, या भागातील गावांना हा प्रकल्प वरदान ठरत आहे.

मागील वर्षी २६ सप्टेंबर व २ नोव्हेंबर रोजी तब्बल दोन वेळा हा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. त्या कारणाने दिवठाणा येथील झोपडपट्टी अतिक्रमित असलेले कुटुंबियांची घरे प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेले होते. त्यांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे ग्रामस्थांना दोन वेळा रात्र जागून काढावी लागली होती.

बऱ्याच दिवसांपासून तेथील नागरिकांची पुनर्वसनासाठी जागा शासनाने व पाटबंधारे विभागाने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जोर धरत होती. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात दिवठाणा येथील काळेगाव फाटा नजिकच्या गट नंबर ६८ मधील ५०० स्क्वेअर फुट जागा शासनाने गाव नमुना आठ साठी बुडित क्षेत्रातील ७३ कुटुंबांना घरे बांधण्यासाठी कागदपत्रे देण्यात आले.

यावेळी उपस्थित बी. एस. किटे नायब तहसीलदार, तलाठी ए. आय. खान, तुषार मेतकर डेप्टी इंजिनियर, एस. एस. पाटील शाखा अभियंता, ग्रामसेवक जाधव, पो. कॉ. विलास पाटील, उमेश सांगळे होमगार्ड, ग्रामस्थ, ज्ञानेश्वर पाटील, राजेश सोनाग्रे, अर्जुन जाधव, श्रावण हेलोडे, अनंता वाकुडकार, अनिल मुंडे, सुभाष वाकुडकर व पुनर्वसित होणारे ७३ कुटुंब यावेळी हजर होते. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com