esakal | अनैतिक संबंधात पती ठरत होता अडसर; विष देण्याचा प्रयत्न फसल्याने रुमालाने गळा आवळून घेतला जीव
sakal

बोलून बातमी शोधा

crime story.jpg

पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरविली असता त्यांच्यासमोर वेगळीच माहिती समोर आली. घटनेत सदर मृतक व्यक्तीची पत्नी व शेजारीच राहणारा अनिल सुरोशे याचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले.

अनैतिक संबंधात पती ठरत होता अडसर; विष देण्याचा प्रयत्न फसल्याने रुमालाने गळा आवळून घेतला जीव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा : अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीसह प्रियकर व इतर दोघा सहकाऱ्यांनी असे एकूण चौघांनी गेलेल्या खुनाची घटना (ता.9) उघडकीस आली. ही घटना बुलडाणा तालुक्यातील हतेडी शिवारातील चिखला परिसरात घडली. याबाबत बुलडाणा शहर पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत असे की, बुलडाणा शहरातील गायरान परिसरात राहणारा गणेश सरोजकर (वय 30) हा गेल्या 25 मे पासून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरविली असता त्यांच्यासमोर वेगळीच माहिती समोर आली. घटनेत सदर मृतक व्यक्तीची पत्नी व शेजारीच राहणारा अनिल सुरोशे याचे अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, सदर संबंधामध्ये गणेश सरोजकर हा अडसर ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढण्याचा नियोजित प्लॅन तयार करण्यात आला.

हेही वाचा - काय म्हणता ! जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या पाण्याचा रंग लाल? नेमके काय झाले? वाचा...

25 मे ला गणेश सरोजकर याला हतेडी शिवारातील चिखला परिसरातील अरुण निकाळजे याचा शेतात बोलावले. यावेळी तेथे त्यांच्यात वाद होऊन गणेशला विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तेथे महेंद्र खिल्लारे रा. नांद्रा कोळी, अरुण निकाळजे हतेडी उपस्थित होते. जीवे मारण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी गणेशचा रुमालाने गळा आवळून खून केला. कुणालाही काही माहित पडू नये यासाठी तेथेच खड्डा खोदून मृत्यूदेह गाडला. 

महत्त्वाची बातमी - अहो आश्‍चर्यम! लोकमान्य टिळकांच्या आधीपासूनच या गावात साजरा होतो सार्वजनिक गणेशोत्सव

परंतु, बेपत्ता झाल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी घटना गांभीर्याने घेत गोपनीय सुत्रांची माहिती घेतल्यानंतर सदर घटना उघडकीस आली. प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी सातवे रत्न दाखविताच घटनेचा क्रम आणि कबुली दिली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात (ता.9) घटनास्थळावरून कुजलेल्या अवस्थेत मृत्यूदेह बाहेर काढण्यात येऊन तेथेच शवविच्छेदन कण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास एपीआय श्री. पवार, कोकिळा तोमर, गजानन लहासे, अमोल खराडे करीत आहे.