esakal | ...म्हणून झाली ग्रामपंचायतींची पंचाईत; ‘तो’ निधी परत पाठविण्याच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

rupees.jpg

कोरोना व्हायरसने संपूर्ण देशासह राज्य तसेच जिल्ह्यातही थैमान घातले आहे.  मेहकर तालुक्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपातळीवर आरोग्यविषयक उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून सूचना करण्यात आल्या होत्या.

...म्हणून झाली ग्रामपंचायतींची पंचाईत; ‘तो’ निधी परत पाठविण्याच्या सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेहकर (जि.बुलडाणा) : वित्त आयोगाचा अखर्चित निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजाचे जवळपास एक कोटी 21 लाख 48 हजार 412 रुपये शासनाला परत जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याच्या दृष्टीने ग्रामपातळीवर खर्च करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतीने खर्च केलेला आहे. मात्र, आता 13 वा वित्त आयोगाचा अखर्चित निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजाची रक्कम परत पाठविण्याच्या सूचना जिल्हा स्तरावरून पंचायत समितीला देण्यात आलेल्या आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची मोठी अडचण निर्माण होणार आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण देशासह राज्य तसेच जिल्ह्यातही थैमान घातले आहे.  मेहकर तालुक्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपातळीवर आरोग्यविषयक उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून सूचना करण्यात आल्या होत्या. त्या सूचनेनुसार विविध ग्रामपंचायतीने आपल्या स्तरावर धूर फवारणी, स्वच्छता यासह इतरही आरोग्यविषयक उपाययोजना राबविल्या आहे. या उपाय योजनेवर विविध ग्रामपंचायतचे हजारो रुपये खर्च झाले आहे. मात्र, एप्रिल महिन्यामध्ये ग्रामपंचायतीने आरोग्यविषयक बाबीवर खर्च करण्यासंदर्भात जिल्हा परिषद स्तरावरून पंचायत समितीला एका पत्राद्वारे सूचना करण्यात आल्या होत्या.

महत्त्वाची बातमी - तीन महिने कळा शोषून अकोलेकरांनी काय धडा घेतला?

त्यानुसार ग्रामपंचायतीने आरोग्यावर खर्च केलेला आहे तर 27 मे ला 13 वा वित्त आयोगाचा अखर्चित निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व्याजाची रक्कम शासनाला परत करण्याच्या सूचना पंचायत समितीला मिळाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने आरोग्यावर केलेला खर्च आता कसा निघणार या  विवंचनेत अनेक सरपंच दिसून येत आहेत. चौदाव्या वित्त आयोगाचे निधीच्या व्याजाचे जवळपास 1 कोटी 21 लाख 48 हजार 412 रुपये शासनाला परत जाणार असल्याने ग्रामपंचायतीने आरोग्यावर खर्च केलेली रक्कम कशी मिळणार यामुळे अनेक ग्रामपंचायतीची मोठी अडचण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा - अरेरे काय ही हलगर्जी! क्वारंटाईन सेंटर बाहेरच घडत आहे असा प्रकार...वाचून व्हाल थक्क

ग्रामपंचायतींवर दुहेरी संकट
याबाबत स्थानिक प्रशासनातील अधिकारी काहीही बोलण्यास तयार नसून, ग्रामपंचायतींना आता खर्चाची चिंता लागली आहे. एकीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने गावात येणार्‍या मोठ्या शहरातील व्यक्तींची कोरटाइन करत सोय करण्याच्या सूचना देण्यात येत आहे तर दुसरीकडे निधीवरील व्याज परत पाठविण्यात सांगितल्यामुळे दुहेरी संकटात सध्या ग्रामपंचायती दिसून येत आहे.