death in buldana district.jpg
death in buldana district.jpg

हृदयद्रावक : ...म्हणून ‘त्या’ हेटाळणीने त्रस्त झालेल्या आमच्या वडिलांनी सोडले प्राण; ही वेळ कुणावरही येऊ नये

बुलडाणा : सध्या कोरोनाची एवढी धास्ती सर्वांनी घेतली आहे की, सर्वसामान्य रुग्णांकडेही संशयाने पाहिले जात आहे. असाच प्रकार आमच्यासोबत घडला आणि झालेल्या हेटाळणीने त्रस्त झालेल्या आमच्या वडिलांनी प्राण सोडले. आता आमचे बाबा आम्हाला कोणी आणून देवू शकणार नाही. परंतु, यापुढे कुणालाही आपले वडील गमविण्याचे वेळ येऊ नये अशी कळकळीची विनंती चिखली येथील नुकतेच मृत्यू झालेले प्रल्हाद इंगळे यांच्या मुलांनी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, चिखली येथील माजी सैनिक असलेले प्रल्हाद इंगळे यांना ताप आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला. निमोनीयाची लक्षणे असल्याने त्यांना एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. तेथे उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी तुमची ट्रिटमेंट संपली असे सांगून घरी पाठविले. मात्र, खोकला थांबत नव्हता पांढऱ्या पेशी वाढल्या होत्या. यावर खासगी डॉक्टरांनी आणखी दुसऱ्या खासगी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला.

तेथे गेल्यानंतर जणूकाही कोरोनाचा रुग्ण आहे या पद्धतीची हेटाळणीची वागणूक सुरू झाली. तेथे एक्स रे रिपोर्ट नील आल्यानंतर एकदा कोरोनाची टेस्ट करून घ्या असा सल्ला दिला. त्यावरही बुलडाण्यातील एका डॉक्टरकडे गेलो. परंतु, त्या डॉक्टरांनीही माणुसकी दाखविली नाही. कोणत्याही तपासण्या न करता आधी कोविडची टेस्ट करा मग बघू असे सांगून अक्षरशः रवाना केले. कोविड सेंटरमध्येही त्यांनी पुन्हा चिखलीला पाठविले. 

तेथे स्वॅब दिला आणि क्वारंटाईन ठेवायचे तर वडील स्वतःला सावरण्याच्या परिस्थितीत नव्हते यामुळे घरी गेलो. घरी उलटी झाली. तब्येत ढासळत चालली. बुलडाण्याच्या कोविड सेंटरवरून शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला मिळाला. तेथे रुग्णवाहिका यायला एक तास लागला. या सगळ्या धावपळीत वडिलांनी प्राण सोडले. जीव गेल्यावरही माणुसकी दिसली नाही. लवकर रुग्णवाहिकाही उपलब्ध करून देण्यात आली नाही. 

जिल्हा शल्यचिकित्सकांना तक्रार केली तर ते म्हणतात माणसाचे आयुष्य 65 वर्षांचे आहे. तुमचे वडील 72 चे झाले त्यामुळे ते बोनस लाईफ जगले. या सर्व परिस्थितीमुळे कोरोनाच्या नावावर चाललेली टोलवाटोलवी हेटाळणी आणि अस्पृश्य समजण्याची माणसीकता बदलली पाहिजे. अशी वेळ कुणावरही येऊ नये अशी अपेक्षा त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

खासगी दवाखान्यात वेळ गेला
सदर प्रकारासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रेमचंद पंडित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सदर रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तत्पूर्वी चिखली येथून त्यांचा स्वॅब घेऊन पाठविण्यात आला. सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात नेण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली. शासकीय यंत्रणेमार्फत शक्य ते सर्व उपाय आपण केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com