Akola News : शेतकरी आत्महत्येची दहा प्रकरणे मदतीसाठी पात्र; तीन प्रकरणांची फेरचौकशी व तीन अपात्र

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून एक लाखाची मदत देण्यात येते
10 cases of farmer suicide eligible for assistance 3 cases re-examined and three disqualified
10 cases of farmer suicide eligible for assistance 3 cases re-examined and three disqualifiedfarm

अकोला : कर्जबाजारीपणा व इतर कारणांमुळे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी आत्महत्येच्या दहा प्रकरणांना शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले, तर तीन प्रकरणाची फेरचौकशी होणार आहे. याव्यतिरिक्त तीन प्रकरणांच्या अपात्रतेवरही शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याबाबतची जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यामध्ये शेतकरी आत्महत्येचे १६ प्रकरण ठेवण्यात आली होते.

दरम्यान मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सततची नापिकी, सावकार किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज, उत्पादना पेक्षा लागवडीचा खर्च अधिक व इतर कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून एक लाखाची मदत देण्यात येते.

संबंधित मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांचे प्रकरण निश्चित करण्यासाठी शेतकरी आत्महत्याग्रस्त समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. २६) पार पडली. बैठकीत एकूण १६ प्रकरण ठेवण्यात आले. त्यापैकी दहा प्रकरण मदतीसाठी पात्र करण्यात आले, तीन अपात्र तर तीन प्रकरणाची फेरचौकशी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समितीचे सदस्य,अधिकारी उपस्थित होते.

असे आहेत पात्र प्रकरणे

दिलीप पवार (वय ३७, रा. अंधारसावंगी, ता. पातूर), किशोर ठाकरे (वय ४०, रा. अकोली जहॉ., अकोट), शिवहरी काळे (वय ६५, रा. तामशी, ता. बाळापूर), दिलीप कातखेडे (वय ३१, रा. देगाव, ता. बाळापूर), जनार्दन ताजणे (वय ५०, रा. पिंपळडोली, ता. पातूर), प्रवीण काकड (वय ३०, रा. पुनोती बु., बार्शीटाकळी), मनोहर किर्दक (वय ६५, रा. कार्ली, ता. मूर्तिजापूर), स्वप्नील नाईक (वय २५, रा. कुरणखेड, ता. अकोला), प्रदीप प्रकाश मोंढे (वय ३२, रा. किनखेड पूर्णा, ता. अकोट), आशीष राऊत (वय ३५, रा. आकोली जहॉं., अकोट).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com