शिवसेना-राष्ट्रवादीचे घोडे एका जागेवर अडले

शिवसेना-राष्ट्रवादीचे घोडे एका जागेवर अडले

अकोला ः शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची पोटनिवडणूक आघाडी करून लढण्यावर जळवपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, एक जागेसाठी आघाडीची घोषणा रखडली असून, गुरुवारी त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यत आहे. (Shiv Sena NCP's focus on one seat in Zilla Parishad elections)

शिवसेना-राष्ट्रवादीचे घोडे एका जागेवर अडले
कोरोना उपचारात खासगी रुग्णालयांची चांदी, दोन्हीकडून काढले बिलं


अकोला जि..प. व पं.सं. पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने महाविकास आघाडीतून अंग काढल्याने शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दोन्ही पक्षाच्या संपर्क मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बुधवारी आघाडीवर चर्चा करण्यात आली. अकोला जिल्ह्याचे संपर्कमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मुंबईतील बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेचे अकोला जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर यांच्यासह डॉ. राजेंद्र शिगंणे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार नितीन देशमुख, उपजिल्हा प्रमुख गोपाल दातकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार तुकाराम बिडकर, हरिदास भदे, बळीराम सिरस्कार आदींची उपस्थिती होती.

शिवसेना-राष्ट्रवादीचे घोडे एका जागेवर अडले
जिल्हा परिषद निवडणूक; ओबीसी आरक्षणाचा तिढा कायम

या बैठकीमध्ये जि.प.च्या १४ जागांच्या वाटपावर चर्चा झाली. शिवसेनेकडून राष्‍ट्रवादी काँग्रेसलाचार जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने १४ पैकी पाच जागांवर निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला. त्यामुळे एका जागेवर आघाडीचे घोडे अडल्याचे दिसून आले.

शिवसेना-राष्ट्रवादीचे घोडे एका जागेवर अडले
रस्त्यासाठी आमदार अधिकाऱ्यांच्या दालनात


आज अंतिम निर्णय
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपावरून सुरू असलेल्या चर्चेत एका जागेची अडचण आली.त्यामुळे बुधवारी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. आता गुरुवारी दोन्ही पक्षांकडून अंतिम चर्चा होणार असून, त्यात सकारत्मक निर्णय होण्याची शक्यता दोन्ही पक्षांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

प्रहारची अनुपस्थिती
मुंबईतील बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेतर्फे प्रहार जनशक्ती पक्षाला उपस्थित राहण्याबाबत विनंती करण्यात आली होती. त्यासाठी डॉ. शिंगणे यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासोबत संपर्कही साधला होता. मात्र, कार्यक्रमात व्यस्त असल्याने प्रहारचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. आघाडीबाबत निर्णय झाल्यास आघाडीकडून नाही तर स्वतंत्रपणे प्रहार जनशक्ती पक्ष पोटनिवडणूक लढवेल, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बबलू जवंजाळ यांनी सांगितले.

Shiv Sena NCP's focus on one seat in Zilla Parishad elections

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com