2nd Phase Lok Sabha Voting : आधी कर्तव्य...नंतर जवाबदारी, वर-वधू मतदान करून लग्नाला रवाना

सातपुड्याच्या कुशीतील नवरदेवाने बोहल्यावर चढण्या आधी मतदान केंद्रावर जाऊन कर्तव्य पार पाडले. 18 वी लोकसभा निवडणूक मधील दुसरा टप्पा दि 26 एप्रिल ला पार पाडत आहे.
2nd phase voting of lok sabha elections bride and groom vote first then marriage
2nd phase voting of lok sabha elections bride and groom vote first then marriageSakal

संग्रामपूर (बुलढाणा) : सातपुड्याच्या कुशीतील नवरदेवाने बोहल्यावर चढण्या आधी मतदान केंद्रावर जाऊन कर्तव्य पार पाडले. 18 वी लोकसभा निवडणूक मधील दुसरा टप्पा दि 26 एप्रिल ला पार पाडत आहे.

याच दिवशी लग्नाची दाट तिथी आहे.लोकशाही ने दिलेला अधिकार हा पार पाडलाच पाहिजे म्हणून पातुडाँ बु येथील सर्व वर व वधू आधी कर्तव्ये नंतर जवाबदारी पार पाडून मतदान करून लग्नाला रवाना होत आहे.

निवडणूक आयोगाने जनतेला आवाहन केले होते.लोकशाही ने मतदान करण्याचा अधिकार दिला आहे.ते कर्तव्य आपण पार पडायला पाहिजे.तुमचे मत हा तुमचा आवाज आहे.उत्सव निवडणूकीचा,अभिमान देशाचा.

सोबतच 26 एप्रिल ही लग्नाची तारीख दाट असल्याने निवडणूक आयोगाने वर वधू आणि ज्याच्या घरी लग्न आहे त्या परिवार ला आवाहन केले होते की लग्नात जाण्यापूर्वी सर्वांनी मतदान करून जावे आणी जास्तीत जास्त मतदान करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी या आवाहन ला प्रतिसाद देत पातुडाँ बु येथे 8 ते 10 वर वधू चे लग्न होते त्यांनी लग्नाला जाण्यापूर्वी आप आपल्या मतदान केंद्रावर मतदान केले व सोबतच जनतेला आवाहन केले की आम्ही मतदान केले तुम्हीही मतदान करा व लोकशाही आणखी मजबूत करून जास्तीत जास्त मतदान करून निवडणूक विभाग ला सहकार्य करा.

या वेळी पातुडाँ बु येथील बुथ क्र 224 मध्ये नवरदेव उमेश रामदास गिरहे,बुथ न 225 वर नवरदेव शुभम अरुण म्हसाळ, बुथ न 227 शुभम ब्रम्हदेव निमकर्डे, सोनाली श्याम इंगळे, अंकुश दीपक नवलखे,पातुडाँ खुर्द येथील बुथ न 231 कृष्णा अरुण वाघ,कोद्री येथील गणेश संतोष शिंदे या वर वधू यानी आधी कर्तव्य....नंतर जवाबदारी अशी टॅग लाईन करून मतदान करून लग्नाला रवाना झाले.

बुलडाणा लोकसभा निवडणुक जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी डाँ किरण पाटील.सहायक निवडणूक अधिकारी व एस डी ओ शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली या वेळी तहसीलदार योगेश टोम्पे,

निवडणूक व नायब तहसीलदार डी एस पल्लडवार,मंडळ अधिकारी हरिभाऊ उकर्डे, ठाणेदार राजेन्द्र पवार,तलाठी अंगुलीमाल कस्तुरे, राजेश तांबट,बी एल ओ संजय सातव,श्रीमती अर्चना तायडे,सुनील दाभाडे,अनंत सातव,विलास इंगळे,सौ ज्योती सातव,कोतवाल सतीश इंगळे,सौ सुनंदा करागळे यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com