esakal | 27 तारखेला सकाळी 37 कोरोना पॉझिटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

37 corona positive on the morning of August 27 in Akola

अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्‍याने वाढत असतानाच आता कोरोना बळींचा आकडाही दीडशेच्या जवळ जात असल्याचे चित्र आहे. अशातच गुरुवारी (ता.27) दोन मृत्यूची नोंद झाली असून, आणखी ३७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

27 तारखेला सकाळी 37 कोरोना पॉझिटीव्ह

sakal_logo
By
विवेक मेतकर

अकोला : अकोल्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्‍याने वाढत असतानाच आता कोरोना बळींचा आकडाही दीडशेच्या जवळ जात असल्याचे चित्र आहे. अशातच गुरुवारी (ता.27) दोन मृत्यूची नोंद झाली असून, आणखी ३७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.

आज सकाळी ३२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात सात महिला व २५ पुरुष आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यात सहा जण सिरसोली ता. अकोट येथील तर दोन जण अकोट येथील, पाच जण वरुर ता. तेल्हारा येथील, तीन जण तेल्हारा येथील, चार जण सुटाळा येथील रहिवासी असून दोन जण जीएमसी येथील तर अन्य माऊंट कार्मेल शाळेजवळ, पंचशील नगर, संताजीनगर, शास्त्रीनगर, काटखेड ता. बार्शीटाकळी, सस्ती ता. पातुर, मलकापूर, मुर्तिजापूर, डाबकीरोड, बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये पाच जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांचाही समावेश आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-3662
मयत-146
डिस्चार्ज-3070
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-446

 
loading image