esakal | विदर्भातील ४० पालख्यांना हवी वारीची परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

विदर्भातील ४० पालख्यांना हवी वारीची परवानगी

विदर्भातील ४० पालख्यांना हवी वारीची परवानगी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः आषाढी वारीला थेट परवानगी न देण्याच्या सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करीत शनिवारी विश्व वारकरी सेनेने सरकारचा निषेध केला. सरकारने ज्ञानाेबा-तुकाेबा यांच्या दाेन पालख्यांना पायदळ वारीची परवानगी द्यावी, विदर्भातील १० पालख्यांना वाहनांने पंढरपूर येथे जाण्याची मुभा द्यावी, अशा मागण्या वारकरी सेनेने केला. सरकारने २४ जूनपर्यंत दखल न घेतल्यास ‘माझी वारी-माझी जबाबदारी’, अशी हाक देत पंढरपूरकडे कूच करण्यात येईल, असा इशारा वारकऱ्यांनी दिला. (40 palanquins from Vidarbha want permission)

हेही वाचा: कोरोनाकाळातही १० टक्के पगारवाढ अन् रोजगारही


पंढरपूर आषाढी पायदळ वारी साेहळ्यात मानाच्या १० पालख्यांसह प्रत्येक तहसीलअंतर्गत पालखी साेहळ्याला परवानगी द्यावी आणि साेहळ्यात १० वारकऱ्यांना मुभा असावी, अशी मागणी विश्व वारकरी सेनेने यापूर्वी केली आहे. याच मुद्दावर ता.१२ जून रोजी अमरावती विभागीय आयुक्तांच्या दालनात विदर्भातील दिंडी प्रमुख व विश्व वारकरी सेनेचे पदाधिकारी यांच्या सोबत बैठक पार पडली. विदर्भातील दिंडी चालकांची नोंदणी प्रशासानाकडे नसल्याने विभागीय कार्यालयात दिंडी व त्यात सहभागी हाेणाऱ्यांची नावे अर्जांसह सादर करावे. त्यावर विचार केला जाईल ,असे आश्वासन वारकऱ्यांना लाेकप्रतिनिधींकडून देण्यात आले.

हेही वाचा: ६८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले दोन हजार!विदर्भातील ४० पालख्यांना हवी परवानगी
विदर्भात मानाच्या पालख्यांव्यतिरिक्त ४० पालख्या आहेत. या पालख्यांना नियम अटींसह वाहनाने पंढरपूर येथे जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी. एका पालखीत १० वारकारी सहभागी हाेतील, अशी भूमिका वारकरी सेनेने घेतली. सरकारने वारकऱ्यांच्या भावनेचा विचार न करता चुकीचा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: नियमांचे उल्‍लंघन केल्‍यामुळे स्‍कायलार्क कोविड केअर सेंटर सिल


‘२४ जूनपर्यंत प्रतीक्षा, नाही तर निर्णय आम्ही घेवू’
पंढरपूर वारीसाठी सरकारने ता. २४ जूनपर्यंत फेरनिर्णय घ्यावा. तोपर्यंत आम्ही प्रतिक्षा करू. आम्ही माऊलीच्या प्रस्थानाच्या दिवशी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून आळंदी पायदळ जाणार आहोत. आमच्या सोबत इतर वारकरी संघटनासुद्धा येणार आहेत. आम्हाला कारागृहात टाकायचे असल्यास आमची तयारी आहे. वारकऱ्यांच्या मागणीची सरकारने दखल न घेतल्यास पुढील स्थितीला सरकार जबाबदार राहिल, असा इशाराही वारकऱ्यांनी दिला आहे.

संपादन - विवेक मेतकर
40 palanquins from Vidarbha want permission

loading image