
अकोला : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खनन करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून गौण खनिजच्या अवैध वाहतूक व उत्खननावर आळा घालण्यासाठी जिल्ह्यात ४८ फिरते पथक (फ्लाईंग स्कॉड) गठित करण्यात आले आहेत. महसूल विभागाचे अधिकारी पथकांच्या कार्यपद्धतीवर नियंत्रक ठेवत असून प्रत्येक पथक आठवड्यातून केवळ एक दिवस सक्रिय राहणार आहे. त्यामुळे अवैध गौण खनिज वाहतुकीला लगाम लावण्यास मदत होईल व अवैध गौण खनिज उत्खननावर सुद्धा आळा बसेल, असा विश्वास खनिकर्म विभागाला आहे.