
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून गुरुवारी (ता. ७) कोरोना संसर्गत तपासणीचे ४८० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४४९ अहवाल निगेटिव्ह तर ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून गुरुवारी (ता. ७) कोरोना संसर्गत तपासणीचे ४८० अहवाल प्राप्त झाले. त्यातील ४४९ अहवाल निगेटिव्ह तर ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. याव्यतिरीक्त २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या कोविड १९ रोगाने जिल्ह्यात थैमान घातलं आहे. कोरोनाचे गुरुवारी (ता. ७) जिल्ह्यात ३१ नवे रुग्ण आढळले. त्यात सकाळी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच
त्यात ११ महिला व १७ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील शास्त्री नगर येथील पाच, मोठी उमरी येथील चार, डाबकी रोड, अकोट, व्हिएचबी कॉलनी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शिवणी, सिंधी कॅम्प, जुना आरटीओ रोड, वाशीम बायपास, हरिहर पेठ, गीता नगर, गोरक्षण रोड, राधाकिसन प्लॉट, जिल्हा परिषद कॉलनी, अंदुरा ता. बाळापूर व तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
सायंकाळी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. त्यात मूर्तिजापूर, तेल्हारा व पातूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहे. याव्यतिरीक्त गुरुवारी (ता. ७) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, आयकॉन हॉस्पीटन येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून तीन, हॉटेल रिजेन्सी येथून दोन, तर बिहाडे हॉस्पीटल येथून तीन तसेच होम आयसोलेशन येथून १०, अशा एकूण २५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
हेही वाचा - शाळेची घंटा विसरली आता, आला सत्राचा अंतिम टप्पा!, पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नो एंट्री
कोरोनाची सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - १०७६६
- मृत - ३२३
- डिस्चार्ज ९८९४
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५४९
(संपादन - विवेक मेतकर)