

Khadan police personnel displaying seized cash recovered during a major operation in Akola.
Sakal
अकोला : निवडणूक बंदोबस्ताच्या पार्श्वभूमिवर अवैध आर्थिक व्यवहारांवर करडी नजर असलेल्या खदान पोलिस स्थानकाच्या पथकाने मोठी कारवाई करत ५० लाखांची रोकड जप्त केली आहे. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, निवडणूक काळातील बेकायदेशीर रोख व्यवहारांवर पोलिसांचे लक्ष असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली.