Akot Crime News : अकोटचे 'नॉट रिचेबल' पाच पोलीस हेड क्वार्टर अटॅच!

गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणात मोठी कारवाई
action in govardhan Haramkar death case akot not reachable five police head quarters attached
action in govardhan Haramkar death case akot not reachable five police head quarters attachedSakal

Akola News : जिल्ह्यातील अकोट पोलीस स्टेशनमध्ये गोवर्धन हरमकार या संशयित आरोपीच्या मृत्यू प्रकरणात पाच पोलिसांना हेडक्वार्टर अटॅच करण्यात आले आहे. सकाळने वारंवार या प्रकरणावर फोकस केल्यानंतर पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली आहे.विशेष म्हणजे कालच अकोट शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे यांना हेडक्वार्टर अटॅच करण्यात आले होते.

अकोट पोलीस स्टेशन अंतर्गत मोबाईल चोरीच्या प्रकरणात गोवर्धन हरमकार याला ताब्यात घेतल्यानंतर या तरुणाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला होता. मृतकांच्या नातेवाईकांनी अकोट शहर पोलिसांवर अनेक गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आतापर्यत पीएसआय राजेश जवरे आणि पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके असे एकत्रित ४ पोलिसांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल झाले.

सध्यास्थित पीएसआय राजेश जवरे आणि पोलीस कर्मचारी सोळुंके न्यायालयीन कोठडीत आहेत. दरम्यान याप्रकरणी गुन्हे दाखल झाले तेव्हापासून अकोट पोलीस ठाण्यातील मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पंचांग आणि रवि सदांशिव हे नॉटरीचेबल होते. दैनिक सकाळने गोवर्धन च्या मृत्यू प्रकरणात अनेक खुलासे केल्यानंतर या नॉट रिचेबल पोलिसांचाही यात सहभाग असल्याचे प्रशासनासमोर मांडले होते. अखेर आज आता या पाचही कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक बच्चनसिंग यांनी ही बदलीची कारवाई केली आहे. 

असे आहे प्रकरण

1. मोबाईल चोरीचा प्रकरणात गोवर्धन हरमकार सह काकास पोलिसांकडून अटक

2. तपासा दरम्यान पोलीस कस्टडीत दोघांनाही मारहाण

3. उपचारादरम्यान गोवर्धन चा मृत्यू

4. गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणात आतापर्यत चार पोलिसांवर खुनाचे गुन्हे दाखल.

5. सुरुवातीला राजेश जवरेसह, पोलिस कर्मचारी चंद्रप्रकाश सोळुंके यांच्यावर गुन्हे दाखल व अटक 

6. अकोटच्या ठाणेदारावर तपण कोल्हे यांच्यावर बदली कारवाई. 

7. रविवारी चौकशीत अडथळा ठरू नये, म्हणून.

पोलीस कर्मचारी मनीष कुलट, विशाल हिवरे, सागर मोरे, प्रेमानंद पंचांग आणि रवि सदांशिव या पोलीस कर्मचाऱ्यांवर देखील आता बदलीची मोठी कारवाई

8. सीआयडी कडून तपास प्रगतीपथावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com