वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १९७६ वाहनांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १९७६  वाहनांवर कारवाई

अकोला : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या १९७६ वाहनांवर कारवाई

अकोला : शहरातील वाहतूक सुरळीत रहावी म्हणून शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलातर्फे ता. १५ ते २१ नोव्हेंबरपर्यंत राबविण्यात आलेल्या मोहिमेत तब्बल एक हजार ९७६ वाहनांवर कारवाई केली. त्यांच्यावर चार लाख ३६ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

अकोला शहरात वाहतुक सुरळीत चालावी तसेच वाहतूक कोंडी होवू काही अनुचित प्रकार होवू नये या करिता विविध कलमांअतर्गत पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वात शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलातर्फे सतत कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ता. १५ ते २१ नोव्हेंबरपर्यंत शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलातर्फे शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालाकाविरूध्द एकूण १९७६ केसेस करण्यात आल्या.

ज्यामध्ये सिट बेल्टचे १३१ केसेस, नंबर प्लेट कलम नुसार ४० केसेस, वाहन चालविताना मोबाईलवर संभाषन करणाऱ्या वाहन चालकांवर ७४ केसेस, ओव्हर स्पीड वाहन चालविणाऱ्या वाहनांवर ४३ केसेस, ट्रीपल सीट वाहन चालविणाऱ्या वाहनांवर १४७ केसेस, विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्या वाहनांवर पाच केसेस व इतर कलमांअंर्तगत एक हजार ५३६ केसेस करण्यात आल्यात. त्यांच्यावर एकूण चार लाख ३६ हजार ४०० रुपये दंड करण्यात आला. ज्यामध्ये एकूण एक लाख ३० हजार ५५० रुपये दंड वसूल करून शासन जमा करण्यात आला. उर्वरीत दंड असणाऱ्यांना वाहन चालकांना दंड भरण्याबाबत कोर्ट नोटीस बजावण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: नाशिक : जि.प. आरोग्य विभागास लागेना चार कोटींचा हिशेब

बारा हजारांवर ऑटोत स्टिकर्स

प्रवासी व महिला सुरक्षेबाबत विशेष मोहीम अंतर्गत शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोलाद्वारे सूचना फलक, स्टिकर्स तयार करून शहरातील एकूण १२ हजार ८९२ ऑटोवर स्ट्रिकर लावण्यात आलेले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात नागरिकांचे हरविलेले तीन मोबाईल व दोन बॅग ट्रॅफीक अमलदारांकडून त्यांच्या मूळ मालकास परत करण्यात आले. शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला मार्फत शहरात विविध वाहनांनी तसेच पैदल प्रवास करणाऱ्या नागरिंकांचे हरविलेले सामान, मोबाईल, पर्स व इतर मौल्यवान वस्तू शहर वाहतूक शाखा अकोला येथे कार्यरत अधिकारी, अमंलदार यांना रस्त्यावर बेवारस स्थितील मिळून आले असता सदर वस्तूंना मूळ मालकांचा शोध घेवून परत करण्यात आले. ज्यामध्ये नागरिकांचे हरविलेले तीन मोबाईल व दोन बॅग ट्राफीक अमलदारांकडून त्यांच्या मूळ मालकास परत करण्यात आले.

loading image
go to top