जि.प. आरोग्य विभागास लागेना चार कोटींचा हिशेब | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य विभाग

नाशिक : जि.प. आरोग्य विभागास लागेना चार कोटींचा हिशेब

नाशिक : शासकीय आरोग्य विभागास औषध पुरवठा करणाऱ्या हापकीन संस्थेकडून जिल्हा परिषद आरोग्य विभागात चार कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याने हा निधी नेमका कशाचा आहे? याचा हिशेब आरोग्य विभागास लागत नसल्याने या निधीचा हिशेब देण्याची विनंती पत्राद्वारे हापकीन संस्थेस जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आली आहे. यादरम्यान हा निधी २०१७-१८ या आर्थिक वर्षातील असल्याने त्याचा विनियोग करता येणार नसल्याने हा संपूर्ण निधी शासनाकडे जमादेखील करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद आरोग्य विभागास लागत असणाऱ्या औषधाची मागणी ही हापकीन संस्थेस केल्यानंतर संस्थेमार्फेत संबंधित औषधाचा पुरवठा हा आरोग्य विभागास करण्यात येत असतो. २०१७-१८ मध्येदेखील जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून औषधाची मागणी हापकीनकडे करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने औषधासाठी निधी मंजूर केल्यानंतर आरोग्य विभागातर्फे सदरचा निधी हा हापकीन संस्थेस वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर हापकीकडून आरोग्य विभागास औषधांचा पुरवठादेखील करण्यात आला.

हेही वाचा: मिरज : पेटवून घेऊन तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मात्र काही दिवसांपूर्वीच हापकीन संस्थेकडून जिल्हा परिषद आरोग्य विभागास चार कोटी रुपये वर्ग करण्यात आला. परंतु औषधपुरवठा केल्यानंतरही हा निधी नेमका कशासाठी परत करण्यात आला, व चार कोटी रुपयांचा हिशेबदेखील विभागास लागत नसल्याने या निधीचा हिशेब देण्याची विनंती आता आरोग्य विभागातर्फे हापकीनकडे करण्यात आली असून तसा पत्रव्यवहारही करण्यात आला आहे.

मात्र हा निधी २०१७-१८ या काळातील असल्याने या निधीचा शासन नियमानुसार विनियोग करता येणार नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संमतीने हा सर्व निधी पुन्हा शासनाकडे जमा करण्यात आला आहे.

loading image
go to top