esakal | अवैध इमारतीवर कारवाई, मोबाईल टॉवरला सुट कशी?
sakal

बोलून बातमी शोधा

मोबाईल टॉवर

अवैध इमारतीवर कारवाई, मोबाईल टॉवरला सुट कशी?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः अवैध बांधकाम केलेल्या इमारतीवर महानगरपालिका प्रशासनातर्फे कारवाई केली जात आहे. मात्र, त्याच इमारवतीवर मनपा प्रशासनाची परवानगी न घेता अनधिकृत मोबाईल टॉवर उभे जात आहे, त्याना प्रशासनाकडून मिळत असलेली सुट शंका स्पद आहे. (Action on illegal building, how to get rid of mobile tower?)

हेही वाचा: दोन गटातील एकूण सहा गंभीर जखमी, दोन ट्रॅक्टर नदीत फेकले


महानगरपालिका हद्दीतील अनेक इमारतीवर रिलायन्स कंपनीने मनपाची नियमानुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, मालमत्ताधारकांनी प्रशासनाची दिशाभूल केली आहे. विकास कामांची परवानगी न घेता अनधिकृत बांधकाम करून मोबाईल टॉवरसाठी जागा भाड्याने दिल्या आहेत. त्याविरुद्ध मनपा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केलेली नाही.

हेही वाचा: खेड्यापाड्यात काम करणाऱ्या युवकाला मिळाली लंडनमध्ये स्कॉलरशिप

त्यातच आता नवीन टॉवर उभारण्यासाठी मपनाकडे परवानगी मागण्यात आली आहे. त्यामुळे अशा टॉवरला परवानगी न देता अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या टॉवरवर कारवाई करण्याची मागणी मनपाचे विरोधी पक्ष नेते साजिद खान पठाण यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रातून केली आहे.

Action on illegal building, how to get rid of mobile tower?

loading image