esakal | शिक्का मारणारे कृषी सेवा केंद्र संचालक ‘हाजीर हो’!
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्का मारणारे कृषी सेवा केंद्र संचालक ‘हाजीर हो’!

शिक्का मारणारे कृषी सेवा केंद्र संचालक ‘हाजीर हो’!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा (जि.अकोला) ः सोयाबीन बियाणे विकताना शेतकऱ्यांना बियाणे देयक शिक्का मारून जबाबदारी झटकू पाहणारे कृषी सेवा केंद्र संचालकांना तेल्हारा तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. तेल्हारा येथील गणेश कृषी सेवा केंद्राच्या संचालकांनी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे विकताना देयकांवर ‘सोयाबीन बियाणे मी माझ्या जबाबदारीवर विकत घेत आहे, तसेच मी उगवण क्षमता तपासून घेईल’, असा शिक्का मारला होता. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’च्या ता. २ जूनच्या अंकात प्रकाशित झाल्‍यानंतर त्याची दखल घेत गुरुवार, ता. ३ जून रोजी पालकमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित कृषी सेवा संचालकांवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार शुक्रवार, ता. ४ जून रोजी तेल्हारा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी गणेश कृषी सेवा केंद्राच्या संचालकांना नोटीस बजावली आहे. (Action on Soybean Vendors Agricultural Service Centers at Telhara Akola)

हेही वाचा: भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे "दादा "?

सोयाबीन

सोयाबीन

शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पावतीवर शिक्के मारून विक्रेत किंवा बियाणे उत्पादकांकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. हा शासनाच्या आदेशाचा व बियाणे अधिनियमाचा भंग आहे. त्यामुळे याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार शुक्रवारी कृषी सेवा संचालकांना नोटीस बजावण्यात आली.

हेही वाचा: खळबळजनक; पोलिस निरीक्षकानेच केला महिला पोलीस शिपायावर बळजबरी अत्याचार

केंद्र संचालकाची १४ जून रोजी सुनावणी
या नोटीसमध्ये कृषी सेवा संचालकांनी बियाणे अधिनियम १९६६, नियम १९६८ नियंत्रण आदेश १९८३ मधील खंड नऊ व तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ मधील तरतुदीचे उल्लंघन केल्याबाबत नोटीस प्राप्त होताच सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्याचा आदेश दिला आहे. सोबतच ता. १४ जून रोजी सकाळी १० वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात उपस्थित होण्याचा आदेशही देण्यात आला आहे.

हेही वाचा: टॅक्स भरायचा बाकी असेल तर लवकर भरा, मिळणार सात टक्के सुटबियाणे विक्रेत्यांना बसणार चाप
शिक्के मारून बियाणे विक्रेते जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारणाऱ्या बियाणे विक्रेत्यांना चाप बसणार आहे.

संपादन - विवेक मेतकर

Action on Soybean Vendors Agricultural Service Centers at Telhara Akola

loading image
go to top