Akola; टॅक्स भरायचा बाकी असेल तर लवकर भरा, मिळणार सात टक्के सुट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola; टॅक्स भरायचा बाकी असेल तर लवकर भरा, मिळणार सात टक्के सुट

Akola; टॅक्स भरायचा बाकी असेल तर लवकर भरा, मिळणार सात टक्के सुट

अकोला ः महानगरपालिका (Akola Muncipal Corporation) हद्दीतील मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी चालू आर्थिक वर्षाकरिता पाच ते सात टक्क्यांपर्यंत सुट जाहीर करण्यात आली आहे. सर्व मालमत्ताधारकांना थकीत व चालू वर्षाची मालमत्ता कराबाबतचे मागणी देयक वितरित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने शहरातील नागरिकांनी थकित चालू वर्षातील कराचा भरणा करून मनपा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन कर विभाग प्रमुख विजय पारतवार यांनी केले आहे. त्यासाठी चालू वर्षातील कराचा भरणा १३ जून पूर्वी केल्यास त्यांना मनपा प्रशासनातर्फे सामान्य कारमध्ये सात टक्के सुट देण्यात येईल. ता.१३ जुलै पूर्वी चालू मालमत्ता कराचा भरणा केल्यास त्यांना सहा टक्के सुट देण्यात येणार आहे. ता.१२ ऑगस्टपूर्वी चालू वर्षातील कराचा भरणा केल्यास त्यांना पाच टक्के सुट देण्यात येणार आहे. (Tax exemption from Akola Municipal Corporation for property tax payers)

हेही वाचा: डम्पिंग ग्राऊंड 'फुल्ल', कचरा घंटा गाड्या लागल्या महानगरपालिकेपुढे

शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच ज्या मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराची मागणी देयक प्राप्त झाले नसतील त्यांनी संबंधित झोन कार्यालयातून प्राप्त करून घ्यावे किंवा मनपाच्या वेबसाईटवरून प्राप्त करून घ्यावे. या वेबसाइटद्वारे आपण ऑनलाइन कराचा भरणा सुद्धा करू शकतो. तरी शहरातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा कर अधीक्षक विजय पारतवार यांनी केले आहे.

हेही वाचा: महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये ‘फ्री स्टाईल’, वाद पोलिसात


अशी मिळणार सवलत
जूनमध्ये भरणा केल्यास ः सात टक्के
जुलैमध्ये भरणा केल्यास ः सहा टक्के
ऑगस्टमध्ये भरमा केल्यास ः पाच टक्के

हेही वाचा: अजूनही येतो घुंगरांचा आवाज, “कंचनी”चा महालाचं गुढ आहे तरी काय?मालमत्ता कराचा न्यायालीयन लढा सुरू
मालमत्ता कराच्या दरावरून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर अद्याप अंतिम निर्णय आलेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने काँग्रेसचे नगरसेवक डॉ. झिशान हुसेन यांच्या याचिकेवर निर्णय घेताना कर वाढ रद्द केली होती. त्याला मनपा प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले आहे. त्याच्यावर मनपा प्रशासना त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे. त्यामुळे हा लढा अद्यापही सुरू आहे.

शाळा, धार्मिक स्थळांना सुट देण्याची मागणी
महानगरपालिका हद्दीतील शाळा, धार्मिक स्थळांना मालमत्ता करातून सुट देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रतिष्ठाणच्या वतीनेही महानगरपालिका आयुक्त व महापौरांना पत्र देवून करात सुट देण्याची मागणी करण्यात आली आहे.

संपादन - विवेक मेतकर

Tax exemption from Akola Municipal Corporation for property tax payers

loading image
go to top