भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे "दादा "?

भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे "दादा "?

शरद येवले

मंगरुळपीर (जि.वाशिम) : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नांदेड वरून थेट वाशिम गाठले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (Nationalist Congress Party) जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे (Chandrakant Thakeray) यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे जंगी स्वागत चंद्रकांत ठाकरे यांनी केल्यावर केलेल्या स्वागतामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर तर नाही ना? त्यांच्या व फडणवीसांमध्ये काही खलबत झाली असेल अशीही चर्चा जिल्हाभरात रंगली आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षण व ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण संपुष्टात आल्याने महाविकास आघाडीच्या सरकारला या विषयावर घेरण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण नियोजन केले असून याचाच भाग म्हणून त्यांनी राज्याचा दौरा आखला आहे. (Welcoming Devendra Fadnavis, NCP's Chandrakant Thackeray from Washim will join BJP)

मराठा आरक्षण
मराठा आरक्षण

यात मराठा आणि ओबीसी समाजातील नेत्यांना जवळ घेण्याचे नियोजित असून समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात भाजपला साथ देऊन भाजपच्या माध्यमातून मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी या दोन प्रवर्गातील जनाधार असलेल्या बड्या नेत्यांना गळाला लावण्याचा विडा फडणवीसांनी उचलल्याचे कळते त्यासाठी अशा वजनदार नेत्यांना भाजपात घेण्याची त्यांची योजना असल्याचे कळते. भाजप मराठा आणि ओबीसीं मधील भाजप विषयी चे डॅमेज कंट्रोल करण्याला येत्या काळात प्रमुख प्राधान्य देणार असून असे करतांना पक्षातील जुन्या नेत्यांऐवजी नव्या दमाच्या वजनदार युवानेत्यांना बळ देणार असून इतर पक्षातील मराठा आणि ओबीसी नेत्यांना भाजपात घेऊन त्यांना राजकीय उंची मिळवून देणार असल्याची चर्चा आहे.

याचाच एक भाग म्हणून ता ३ जून रोजी नांदेड येथून थेट वाशिम जिल्ह्यात येऊन विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना बाबत भेट दिली असल्याचे वर वर बोलल्या जात आहे परंतु माजी जिल्हापरिषद अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांना सदिच्छा भेट दिल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे "दादा "?
अजूनही येतो घुंगरांचा आवाज, “कंचनी”चा महालाचं गुढ आहे तरी काय?

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी चंद्रकांत ठाकरे यांचे स्वागत स्वीकारून चर्चा केल्याचे समजते.या स्वागत भेटीने जिल्ह्यातील राजकीय समिकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.चंद्रकांत ठाकरे हे जिल्ह्यातील एक मोठे राजकीय प्रस्थ, असल्याने त्यांनी चंद्रकांत ठाकरे यांना भाजपात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. चंद्रकांत ठाकरे भाजपात आल्यास भाजपा विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाला न्याय व वाव मिळू शकतो. ही ऑफर असू शकल्याची चर्चा जोरात रंगली आहे.

भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे "दादा "?
Buldhana; सिंदखेडराजा उपनगराध्यक्षवर 15 नगरसेवकांचा अविश्वास प्रस्ताव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी देतांना चंद्रकांत ठाकरे यांना नेहमीच डावलल्याची त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची भावना आहे याबाबतसुद्धा या भेटीत उघड चर्चा झाल्याचे कळते. पश्चिम वऱ्हाडातील राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीत चंद्रकांत ठाकरे यांचा मोलाचा वाटा आहे त्यांनी तन-मन-धनाने पक्षवाढीसाठी परिश्रम केलेले असतांना कालपरवापर्यंत पक्षाला नावही माहीत नसलेल्या लोकांना पक्षाने वरच्या पायऱ्या चढविल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात चंद्रकांत ठाकरे यांच्यावर नेहमीच अन्याय झाल्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची भावना पाहता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नेमक्या ह्याच बाबी हेरून या मुद्द्याला हात घातल्याने चंद्रकांत ठाकरे राष्ट्रवादीशी घरोबा तोडून भाजपात जाणार का ? अशा राजकीय चर्चा आहेत. ठाकरे त्यांनी वाशिम जिल्हा परिषदेत सभापती,उओपाध्यक्ष व अध्यक्ष पदावर कामकाज केलेले आहे.

भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे "दादा "?
प्रधानमंत्री आवास योजनेत धनदांडे; सर्व्हे एजन्सी,नगरसेवक व अधिकाऱ्यांचा सांघिक प्रताप

ओबीसींचे मोठे नेतृत्व हेरून भाजप पक्षाविषयी मराठा आणि ओबीसी समाजातील गेल्या काळात झालेली गैरसमजाची भूमिका बदलण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची रणनीती असून राज्याच्या सत्तास्थापनेत स्वबळावर बहुमत गाठण्यासाठी भाजपा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेण्यासाठी मोहीमेवर असल्याची चर्चा रंगात आली आहे. मराठा व ओबीसी समाज सोबत आल्याशिवाय भाजपला हे स्वप्न गाठता येणे अशक्य असल्याने पक्षाने या समाजातील गेल्या काळात खराब झालेली प्रतिमा सुधारत नव्या दमाच्या ओबीसी व मराठा नेत्यांना पक्षात घेण्याची कसरत चालविल्याची चर्चा आहे. चंद्रकांत ठाकरे यांना पक्षात घेऊन दोन ते तीन जिल्ह्यांची मोठी जबाबदारी त्यांच्यावर देण्यात येणार या चर्चेत कितपत तथ्य आहे हे अजून कळले नसले तरीही याबाबत भेटीत चर्चा झाल्याची वार्ता मात्र राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे "दादा "?
टॅक्स भरायचा बाकी असेल तर लवकर भरा, मिळणार सात टक्के सुट

दीर्घ अनुभव,केलेले कार्य या बळावर विधानमंडळात नेतृत्व करण्याची संधी मिळावी ही चंद्रकांत ठाकरे यांची आकांक्षा लपून राहिलेली नाही. हे ध्येय त्यांनी अनेकदा बोलूनसुद्धा दाखविलेले आहे मात्र राष्ट्रवादीत राहून ध्येय गाठणार की आलेल्या संधीच सोन करणार याबाबतचा निर्णय स्वतः चंद्रकांत ठाकरे चांगल्या रीतीने घेऊ शकतात असे मत एका राजकीय विश्लेषकांनी "सकाळ' जवळ व्यक्त केलं आहे

फडणवीस-ठाकरे भेटीने नवे राजकीय समीकरण उदयास येणार ?

चंद्रकांत ठाकरे यांना राजकीय वारसा असून त्यांचे वडील सुभाषराव ठाकरे हे राज्याचे माजी राज्यमंत्री आहेत. त्यांनी 15 वर्ष जिल्ह्याचे नेतृत्व केले आहे. खा.शरदचंद्र पवार यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी पाठिंबा दिलेल्या आमदारांच्या गटात ते सामील होते.राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीत त्यांचा समावेश होता. तसेच सुभाषराव ठाकरे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व फडणवीस यांचेशी असलेले मधुर संबंध असा राजकीय वारसा असल्याने चंद्रकांत ठाकरे यांच्या भाजपा सोबत जाण्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलू शकते. मात्र या राजकीय चर्चावर खुद्द चंद्रकांत ठाकरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही त्यामुळे त्यांच्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळू शकलेला नाही. दरम्यान याविषयी राजकीय चर्चा चांगल्याच रंगल्या असून राजकीय विश्लेषक आपापली वेगवेगळी मते व्यक्त करीत असल्याचे दिसून येते.

संपादन - विवेक मेतकर

Welcoming Devendra Fadnavis, NCP's Chandrakant Thackeray from Washim will join BJP,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com