वऱ्हाडात १६७६ ग्राहकांची ‘बत्ती गुल’

वऱ्हाडात १६७६ ग्राहकांची ‘बत्ती गुल’

अकोला ः महावितरण अकोला परिमंडलात येणाऱ्या अकोला, बुलडाणा, वाशीम या वऱ्हाडातील तीन जिल्ह्यातील १६७६ वीज ग्राहकांचा पुरवठा थकीत देयकांमुळे खंडीत करण्यात आला आहे. वाढलेली थकबाकी महावितरणचा आर्थिक डोलारा अडचणीत आणणारी असल्याने ही मोहीम राबविली जात आहे. वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यात गेले दोन दिवसांपासून राबविल्या जात असलेल्या मोहिमेत वीजबिल भरण्याला प्रतिसाद न देणाऱ्या १४४३ घरगुती, १८९ वाणिज्यिक आणि ४४ औद्योगिक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. त्यांच्याकडे अनुक्रमे एक कोटी १० लाख, १९.२६ लाख आणि १०.५५ लाख रुपयांचे देयके थकीत आहेत. (Action taken by MSEDCL for recovery of arrears)

कोरोना काळात वसुलीपेक्षा महावितरणने सेवेला प्राधान्य देत अखंडित वीज पुरवठा केला. परंतू या काळा अपवादात्मक ग्राहक वगळता वीज ग्राहकांनी वीजबिल भरण्याकडे पुर्णता दुर्लक्ष केल्याने महावितरणसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे ता. ३० जूनपर्यंत ४३२ कोटीच्या वसुलीचे लक्ष्‍य गाठण्यासाठी महावितरणने कारवाई सुरू केली आहे.

वऱ्हाडात १६७६ ग्राहकांची ‘बत्ती गुल’
नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली



पाच हजारांपेक्षा अधिक थकीत देयके असलेले ग्राहक लक्ष्य
अकोला परिमंडळात विविध वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून ४३२ कोटी थकित देयके वसूल करावयाचे आहे. परिमंडलात एक लाख ४१ हजार ३२० असे घरगुती ग्राहक आहेत त्यांच्याकडे प्रत्येकी पाच हजार आणि त्यापेक्षा जास्त थकबाकी आहे. हिच संख्या वाणिज्यिक ग्राहकांची १८ हजार २३६ आणि औद्योगिक ग्राहकांची संख्या ५ हजार २८ आहे. त्यांच्याकडे अणुक्रमे १६२ कोटी, २९ कोटी आणि २४ कोटी रुपयांची वीज देयकांची थकबाकी आहे.

वऱ्हाडात १६७६ ग्राहकांची ‘बत्ती गुल’
राजीनाम्यानंतर राजकारण तापले, समन्वय समितीची बंदद्वार चर्चा

सर्वाधिक थकबाकी बुलडाणा जिल्ह्यात
थकबाकीदार घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांमध्ये सर्वात जास्त म्हणजे ६८ हजार घरगुती ग्राहक हे बुलडाणा जिल्ह्यात आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी पाच हजार आणि त्यापेक्षा जास्त रुपये असे एकूण ७४ कोटी ७१ लाख वीज देयकाचे थकित आहे. वाणिज्यिक ग्राहकांची संख्या ही ७८२१ असून, त्यांच्याकडे १२ कोटी थकले आहे.औद्योगिक थकबाकीदारांची संख्या ही २३०० असून, थकबाकी ही नऊ कोटी ४० लाख आहे.

वऱ्हाडात १६७६ ग्राहकांची ‘बत्ती गुल’
दुबार पेरणीचे संकट; कुठे अवर्षण, तर कुठे बियाणे कुजले

अकोला जिल्ह्यात ५२५०० घरगुती ग्राहकांकडे ६२ कोटीची वीज देयके थकली आहेत. ७२२० वाणिज्यिक ग्राहकांकडे १२ कोटीची वीज देयके थकली आहेत तर १७५२ औद्योगिक ग्राहकांकडे ७ कोटी ८२ लाख वीज देयकाचे थकले आहे. हिच संख्या वाशीम जिल्ह्यातील २० हजार ७३० घरगुती ग्राहकांकडे २५.२० कोटी,३२०० वाणिज्यिक ग्राहकांकडे ५.३२ कोटी आणि औद्योगिक वर्गवारितील ९८० ग्राहकांकडे ६.७४ लाख वीज देयकाचे थकित आहे.

संपादन - विवेक मेतकर

Action taken by MSEDCL for recovery of arrears

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com