नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली

नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली

खामगाव (जि.बुलडाणा) : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवाले शिवसेनेला संपवित आहेत. मंत्रालयात केवळ त्‍यांचीच चलती असून शिवसेना ही केवळ नामधारी सत्‍तेत आहे. त्‍यांच्‍या कोणत्‍याही आमदारांची कामे होती नाहीत. त्‍यामुळे बहुतांश शिवसेना आमदार हे नाराज असून प्रताप सरनाईक यांनी लेटर बॉम्‍ब द्वारे जे काही उध्दव ठाकरेंना सांगितले ती नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांच्‍या मनातील खदखद असून अनेक आमदारांनी ही अभद्र आघाडी आवडलेली नाही, असा शाब्‍दीक टोला राज्‍याचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेला लगावला. ओबीसी आरक्षणासंदर्भात भाजपाच्‍या वतीने २६ जून रोजी करण्यात येणाऱ्या चक्‍का जाम आंदाेलनाबाबत माहिती देण्यासाठी खामगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेकरीता ते आले होते. (Chandrasekhar Bavankule criticizes the government over letter bomb)

नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली
नेता असावा तर असा! वेशांतर करुन गुटखा विक्रेत्यांवर बच्चू कडूंची धाड

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला स्‍वबळाचा नारा, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्रित निवडणूक लढण्याची भाषा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्‍या वर्धापन दिनी केलेले भाषण आणि त्‍यातच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी टाकेला भाजपशी जुळवून घेण्याचा लेटरबॉम्‍ब यामुळे सध्या राजकारण ढवळून निघत आहे. परंतु या सर्व मुद्यांमध्ये लेटरबॉम्‍ब हा मुद्या सध्या गाजतो आहे.

नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली
होणाऱ्या पती समोरच प्रेयसीला वाहनातून पळविले

ईडीच्‍या रडारवर असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना खुले पत्र पाठवून सरनाईक यांनी त्‍यांना भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला कमकुवत करीत आहेत. भाजपशी युती केल्‍यावर शिवसेनेला फायदा होईलच, शिवाय आमच्‍या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल असे त्‍यांनी पत्रात म्‍हटले आहे.

नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली
दहावीच्या शिक्षकांची दमछाक, परीक्षेसाठी निरोप पाठवून दुर्लक्ष

याबाबतच पत्रकारांनी बावनकुळे यांना विचारणा केली असता ते म्‍हणाले, उध्दव ठाकरे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचा नावांचा तसेच युतीचा उल्‍लेख करीत जनतेला मते मागितली. परंतु विधानसभा निवडणूकीचे निकाल लागताच वेगळाच सुर आवळत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अभ्रद्र आघाडी करीत सत्‍ता स्‍थापन करुन पाठीत खंजीर खुपसला. उध्दव ठाकरे यांचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेला देखील आवडलेला नाही. तसेच शिवसेना आमदार देखील नाराज आहेत. राज्‍याचे मंत्रालय सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्‍या ताब्‍यात असून शिवसेना ही केवळ नामधारी म्‍हणून सत्‍तेत आहे. त्‍यांच्‍या आमदारांची कोणतीच कामे होत नाही.

नव्‍वद टक्‍के शिवसेना आमदारांची खदखद सरनाईकांनी पत्रात मांडली
रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी तेल्हारा येथे गाढव आंदोलन

तसेच त्‍यांचेच नेते फोडल्‍या जात असून शिवसेनेला संपविण्याचा कार्यक्रम दोन्‍ही पक्षांनी लावला आहे. ही बाब महाराष्ट्रातील प्रत्‍येक जिल्‍ह्यातील स्‍थानिक नेत्‍यांना कळून चुकल आहे. त्‍यामुळेच नव्‍वद टक्‍के आमदारांच्‍या मनातील खदखद प्रताप सरनाईक यांनी बाेलून दाखवली. शेवटी ते म्‍हणाले की, पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला महाराष्ट्रातील जनता कधीच माफ करणार नाही.

संपादन - विवेक मेतकर

Chandrasekhar Bavankule criticizes the government over letter bomb

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com