-योगेश फरपट
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) चे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकोला दौरा पक्ष संघटनेसाठी निर्णायक टप्पा ठरण्याची शक्यता आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात काही नेत्यांमध्ये कार्यक्रमांबाबत मतभेद दिसून येत असले, तरी हे चित्र काहीसे वरवरचे असून, खऱ्या अर्थाने पक्षाला एकत्र आणण्याचे काम आमदार अमोल मिटकरी यांनी शांतपणे आणि सातत्याने सुरू ठेवले आहे.