अकोला : जिल्ह्यातील जलाशयांमध्ये ८० टक्के जलसाठा

दोन्ही मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू; मध्यम प्रकल्पही फुल्लं
Akola 80 percent water storage
Akola 80 percent water storage

अकोला : जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण २४ जल प्रकल्पांमध्ये शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत ८० टक्के जलसाठ्याची नोंद झाली आहे. काटेपूर्णा व वान या जिल्ह्यातील दोन्ही मोठ्या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असून, मोर्णा, निर्गुणा हे मध्यम प्रकल्प सुद्धा १०० टक्के भरली आहेत.

गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जिल्ह्यात जूनमध्ये मॉन्सूनचा जोर दिसून आला नाही. त्यामुळे जून अखेरपर्यंत जिल्ह्यातील जलाशयांची पातळी खाली गेलेली होती. मात्र, जुलैमध्ये पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात जलाशयांमध्ये भरपूर जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यातील मोठे व शहरासह शेती तसेच औद्योगिक वसाहतींना पाणी पुरवठा करणारा काटेपूर्णा प्रकल्प ८० टक्के तर, वान प्रकल्प ७३ टक्के भरल्याची ६ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत नोंद झाली असून, दोन्ही प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या प्रकल्पांमध्ये येणाऱ्या प्रवाह परिसरात अजूनही पाऊस सुरू असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून, लगतच्या गावांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दगडपारवा जलाशयामध्ये सुद्धा ९७.९७ टक्के तर, पोपटखेड जलाशयात ८५.१७ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

दगडपारवा प्रकल्पही फुल्ल

बार्शीटाकळी तालुक्यातील जलाशय सुद्धा फुल्लं झाला असून, शनिवारी सकाळपर्यंत त्यामध्ये ९७.९७ टक्के जलसाठ्याची नोंद झाली. त्यामुळे या जलाशयातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू असून, विद्रुपा नदीकाठील गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

काटेपूर्णा प्रकल्पातनू दुपारी १ वाजेपर्यंत नदीपात्रात होत असलेला विसर्ग ६९.८० घ.मी./से. वरून कमी करून २३.६९ घ.मी./से. एवढा करण्यात आला. प्रकल्पाची २ वक्रद्वारे प्रत्येकी १५ सेंमी उंचीने उघडून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे तसेच वान प्रकल्पातून दुपारी ४ वाजता नदीपात्रात होत असलेला विसर्ग २८.८६ घ.मी./से. वरून वाढवून ६९.१५ घ.मी./से. एवढा करण्यात आला आहे. प्रकल्पाचे ४ वक्रद्वारे प्रत्येकी ३० सेंमी उंचीने उघडून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार असून, नदी काठच्या गावातील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा पूर नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील जलाशये व उपलब्ध जलसाठा

जलाशय उपयुक्त जलसाठा (दलघमी) टक्केवारी

काटेपूर्णा ६९.८० ८०.८३

वान ५९.८१ ७२.९८

मोर्णा ४१.४६ १००

निर्गुणा २८.८५ १००

उमा १०.११ ८६.५२

एकूण लघु (२४) ६७.२० ६९.४८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com