Makar Sankranti Festival: सावधान : पतंगीचा मांजा बेतू शकतो जीवावर!

अपघातासाठीही ठरू शकते कारणीभूत
Nylon manja Makar Sankranti Festival
Nylon manja Makar Sankranti Festivalsakal

अकोला : मकरसंक्रांतीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे पतंगीचा मोसम जोमात सुरू झाला आहे. त्यासोबतच पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांज्यामुळे होणारे अपघातही घडत आहेत.

बंदी असलेला नायलॉन मांजा बाजारात खुलेआम विक्री होत असल्याने पशू-पक्ष्‍यांसोबत दुचाकी चालकांसाठीही घातक ठरणार आहे.

त्यामुळे पुढील काही दिवस वाहन चालविताना चला सांभाळूनच रहावे. नुकताच मांज्यामुळे डाबकी रोडवर एका बालकाचा गळा चिरल्या गेला होता.

पतंग उडविण्याचा मोह लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच होतो. हा मोह त्यांना टाळताही येत नाही.

मात्र, शहरी भागात महावितरणाच्या लघु व उच्च दाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले असते आणि अनेकदा पतंग उडविताना किंवा कापलेले पतंग विजेच्या तारांवर किंवा खांबांवर अडकतात, अशावेळी ती अडकलेली पतंग काठ्या, लोखंडी सळाखी किंवा गिरगोट यांच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न केला जातो.

या प्रयत्नात अनेकदा जिवंत विद्युत तारेला स्पर्श होण्याची शक्यता असल्याने अडकलेली पतंग काढण्याचा प्रयत्न जिवावर बेतू शकतो. संक्रांत हा आनंदाचा उत्सव असून, त्याला गालबोट लागू नये, याकरिता पतंग उडविताना पुरेपूर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

बरेचदा अडकलेल्या पतंगीचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नातही विजेचा भीषण अपघात होण्याची दाट शक्यता असते.

सध्या बाजारात धातुमिश्रित मांजा मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता उपलब्ध आहे, हा मांजा वीजप्रवाही तारांच्या किंवा रोहित्र वा महावितरण यंत्रणेच्या संपर्कात आल्यास त्यातून वीज प्रवाहित होऊन प्राणांतिक अपघाताची शक्यता आहे.

त्यासोबत धातू मिश्रीत नायलॉन मांज्यामुळे रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांच्या गळ्यात अडकून प्राणांतिक अपघात होण्याची शक्यताही असते.

असे प्रकार यापूर्वी अनेक वेळा घडले आहेत. त्यामुळे पालकांना मुलांना पतंग उडविण्यासाठी मांज्या घेवून देताना व मुलं पतंग उडवित असताना पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.

वाहन चालकांनी

घ्यावी ही काळजी!

वाहन चालकांनी पुढील दोन-तीन महिने वाहन चालविताना वेगावर नियंत्रणे ठेवावे.

वाहन चालविताना चेहरा व गळ्यावर कापड बांधवा. जेणे करून रस्त्यावर आडवा आलेल्या मांज्याने कोणतीही गंभीर दुखापत होणार नाही.

मुले पतंग पकडण्यासाठी रस्त्यांवरून धावतात. त्यामुळे ज्या भागात पतंग उडविणारी मुले आहेत, तेथे गाडीचा वेग अत्यंत्य कमी ठेवा.

पतंग उडविताना याची घ्या काळजी

वीज तारांवर अडकलेली पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.

तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.

अडकलेली पतंग किंवा मांजा काढायला रोहित्रावर चढू नये.

धातुमिश्रित अथवा नायलॉनचा मांजा टाळावा.

वीज तारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.

तारांत अडकलेली पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.

पतंग उडविणाऱ्या पाल्यांकडे पालकांनी लक्ष द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com