कापसाचा हंगाम संपत आला तरी चार हजार शेतकऱ्यांना बियाण्यांचे अनुदानच मिळाले नाही, आता पुन्हा मुतदवाढ

 Akola Agriculture News Four thousand farmers have not received seed subsidy even after the end of cotton season
Akola Agriculture News Four thousand farmers have not received seed subsidy even after the end of cotton season

अकोला :  जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बीटी बियाणे वितरण योजनेला लागलेले दिरंगाईचे ग्रहण अद्यापही कायमच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस घरात व बाजारात पोहचल्यानंतर सुद्धा अद्याप ३ हजार ९२५ शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

जिल्हा परिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी सदर योजनेसाठी ९००६ लाभार्थी निवडीचे लक्षांक ठेवले होते. त्यापैकी आतापर्यंत प्रत्यक्षात ५ हजार ८१ लाभार्थ्यांचेच प्रस्ताव लेखा विभागाला सादर करण्यात आले असून संबंधितांच्या खात्यात ६४ लाख ७० हजार ५४० रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.

हेही वाचा - ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....

आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत २ कोटी ४ लाख २५ हजार रुपयांच्या योजना राबविण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर बीटी बियाणे वाटप करण्याच्या योजनेचा सुद्धा समावेश आहे. जून महिन्याच्या शेवटी शेतकऱ्यांना कपाशी बीजी-२ बीटी बियाणे लागवडीसाठी ९० टक्के अनुदानावर देण्याच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

त्यानंतर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत योजनेसाठी १ कोटी १८ लाख ४३ हजार रुपयांची भरिव तरतूद करण्यात आली. त्यामुळे ९ हजार ६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्याचे लक्ष सत्ताधारी वंचित बहुजन आघाडीने ठेवले होते. परंतु शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी करुन त्यांच्या घरात कापूस पोहचल्यानंतर सुद्धा ३ हजार ९२५ शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याचे वास्तव आहे.

हेही वाचा - प्रेमात आंधळा झालेल्या प्रियकरचा असाही प्रताप, धक्कादायक पाऊल उचलल्याने पोलिसांच्याही डोक्याला ताप

प्रस्तावात त्रृटी
योजनेसाठी काही लाभार्थ्यांनी त्रुटीपूर्ण प्रस्ताव सादर केल्याचे समोर आले आहे. काही लाभार्थ्यांनी देयकाची छायांकित प्रत जाेडली असून, क्षेत्रफळ कमी असतानाही (उदा. ०.९३ आर) दाेन बियाणे बॅगचे देयक जाेडले आहेत. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यास क्षेत्रफळानुसार बॅगचे अनुदान द्यावे लागणार आहे. दरम्यान योजनेसाठी अद्याप निवड झालेल्या २ हजार १३४९३७ शेतकऱ्यांनी अर्जातील त्रुटी पूर्णच केली नाही. याव्यतिरीक्त पंचायत समिती स्तरावर ९६१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव त्रुटीपूर्ण असल्याने प्रलंबित आहेत.

हेही वाचा - नवरा-बायकोत अंड्यावरुन झालं कडाक्याचं भांडण शेवटी अंड्यामुळे मिटलं

अशी आहे स्थिती
- लाभार्थी लक्षांक - ९ हजार ६
- प्राप्त प्रस्ताव - ५ हजार १८१
- अप्राप्त अर्ज - ३ हजार ८९८
- लाभ मिळालेले लाभार्थी - ५०८१
- रक्कम जमा - ६४ लाख ७० हजार ५४० रुपये

क्लिक करा - अकोला जिल्ह्यातील बातम्या

आठ दिवसांची मुदतवाढ
योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सुद्धा अद्याप योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी व अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी ५ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आठ दिवसांमध्ये अर्जातील त्रुटी दूर करू शकतील.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com