esakal | शंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Marathi News Mehkar and Chikhali Shankarpalya social media quarrel in Buldana district goes viral

प्रचंड व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत सर्वांना शंकरपाळ्या सहज दिसला मात्र, भावासाठी लगेच दगड उचलून हत्यारबंद होणारा शंकरपाळ्याचा छोटा भाऊ कुणालाच दिसला नाही. 

शंकरपाळ्या अन् कारल्याच्या भांडणात छोट्या भावाची एन्ट्री, वाद मिटणार की आणखी वाढणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला: तुम्ही लहान मुलांची भांडणं कधी बघीतली आहेत का? त्यांची भांडणं तशी मजेशीर असतात. ते एवढे निरागस असतात की, त्यांचं कितीही सिरीअस असलेलं भांडण मजेशीर वाटू लागतं.

अशाच एका भांडणाचा व्हिडीओ सध्या फेसबुकवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. यात दोन लहान मुले त्यांच्या गावातील गल्लीत भांडत असून एकमेकांना धमकावत आहे. एकमेकांना मारण्याची भाषा करत आहे. तर दुसरा एकाला शंकरपाळ्या म्हणून शिवी देत चिडवतो आहे.

हेही वाचा -आक्रमक आमदार बच्चू कडू यांच्या गाडीसमोर शेतकऱ्यांचाच ठिय्या!

प्रचंड व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत सर्वांना शंकरपाळ्या सहज दिसला मात्र, भावासाठी लगेच दगड उचलून हत्यारबंद होणारा शंकरपाळ्याचा छोटा भाऊ कुणालाच दिसला नाही. 

खरं तर हा व्हिडीओ #शंकरपाळ्या असा हॅशटॅग वापरून लोक त्यांच्या फेसबुक वॉलवर शेअर करत आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ बघाल तर पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला बालपणीच्या तुमच्या अनेक गोष्टी अगदी सहज आठवतील. कारण बालपणी प्रत्येकाचंच कुणासोबत तरी भांडण नक्कीच झालेलं असतं.

भांडण मिटलं
सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असलेलं हे भांडण एका पत्रकाराच्या मध्यस्थीने शेवटी मिटलं आणि एका मोठ्या गमतीशीर वादावर पडदा पडला. पण तोपर्यंत नेटकऱ्यांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्यात. 

बुलडाणा जिल्ह्यातील दोन्ही मुले
यातील शंकर हा बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावचा आहे आणि कार्तिक हा मेहकर तालुक्यातील कळमेश्वर येथील असून हे भांडण कळमेश्वर येथे झालेले आहे कारण अंबाशी गावच्या शंकरच्या मावशीचे गाव कळमेश्वर आहे शंकर मावशीच्या गावी गेला असताना हे भांडण झालंय

हेही वाचा -  पालकमंत्री बच्चू कडू यांच्या एका आदेशाने जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दिशाच बदलली

खेळता खेळता होतं भांडण
यात दोन मुले खेळता खेळता अचानक भांडू लागतात. एकमेकांना धमकावू लागतात.. पण लोकांना यातील सर्वात जास्त आवडलेला डायलॉग व्हिडीओच्या शेवटी आहे. यात एक मुलगा दुसऱ्याला ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई' असं म्हणतो. खरंतर त्यांचं सिरीअस भांडण सुरू आहे. पण हा डायलॉग ज्याप्रकारे एकाने म्हटला आपल्याला हसू कोसळल्याशिवाय राहत नाही. 

हेही वाचा रात्री न्यायालयाचे कुलुप तोडण्याचा चौकीदाराला आवाज, बघतो तर काय!

डायलॉगबाजीची नेटकऱ्यांना भुरळ
व्हिडिओतील ही दोन्ही मुले लहानच आहेत. पण त्यांची भांडणाची स्टाइल लोकांना चांगलीच आवडली आहे. इतकेच काय तर त्यांचे फोटो आणि डायलॉग वापरून सोशल मीडियावर मीम्सही व्हायरल होऊ लागले आहेत. दोघेही एकमेंकाना हातही लावत नाही. पण त्यांची डायलॉगबाजी लोकांचं मन जिंकून गेली आहे. खरंच बालपण किती भारी असतं ना?

(संपादन - विवेक मेतकर)