कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुद्धा कोरोनाचा फटका,  कर्मचारी समुपदेशनाची प्रक्रिया स्थगित

सुगत खाडे  
Monday, 27 July 2020

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतीभा भोजने यांच्या दालनात कार्यरत परिचराला (शिपाई) कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या कामकाजावर सुद्धा झाला असून 27 व 28 जुलैरोजी आयोजित कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया (समुपदेशन) तुर्तास पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

अकोला ः जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतीभा भोजने यांच्या दालनात कार्यरत परिचराला (शिपाई) कोरोनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या कामकाजावर सुद्धा झाला असून 27 व 28 जुलैरोजी आयोजित कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया (समुपदेशन) तुर्तास पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 7 जुलैरोजी शासनादेश जारी करुन कर्मचारी बदल्या 31 जुलैपर्यंत करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने 9 जुलै 2020 रोजी ग्रामविकास विभागाने सुद्धा परिपत्रक जारी करुन जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

सदर आदेशाच्या अधीन राहुन जिल्हा परिषदेसह त्याअंतर्गत येत असलेल्या सात पंचायत समित्यांमध्ये कार्यरत 15 टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. 10 टक्के कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व 5 टक्के बदल्या विनंतीवर करण्यात येणार आहेत. त्यासाठी सेवा ज्येष्ठ कर्मचाऱ्यांची यादी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने तयार केली आहे. परंतु बुधवारी (ता. 22) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात कार्यरत परिचरच कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याचा फटका आता कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना बसला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बदल्यांची प्रक्रिया पुढील आदेशपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
 
10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्‍वभूमीवर या आर्थिक वर्षात 31 जुलैपर्यंत बदल्या करण्याची मुदत शासनाने दिली होती. परंतु शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सदर प्रक्रियेला 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola also hits corona over staff transfers, postpones staff counseling process