अकोला : ऑटोत लावणार चालक, मालकाची फोटोसह माहिती!

नियम न पाळणाऱ्यावर होणार कारवाई
Auto Rikshaw
Auto Rikshawsakal

अकोला : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलिसांनी ऑटोमध्ये चालक व मालकांच्या फोटोसह त्यांची संपूर्ण माहिती प्रवाशांना दिशेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक केले आहे. सोबतच वाहतूक नियंत्रण शाखा व पोलिसांचे हेल्पलाईन क्रमांकही ठळकपणे लावण्याचे निर्देश दिले आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ऑटो चालक, मालकांना पोलिस कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.

ऑटोने प्रवाश करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही असुविधा होऊ नये. रात्रीच्या प्रवाशात त्यांना अप्रिय घटनांना सामोरे जावे लागू नये म्हणून वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात प्रभावी उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे.

Auto Rikshaw
आटपाडी : शुध्द पाणी विट्याला लागते; आटपाडीला का नको?

त्यादृष्टीने काही दिवसांपूर्वीच त्यांनी ऑटो चालकांची बैठकही आयोजित केली होती. आता सर्व ऑटो चालक यांना त्यांचे टॅक्सी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीमध्ये पोलिस हेल्पलाईन क्रमांक, दामिनी पथक हेल्पलाईन क्रमांक, पोलिस नियंत्रण कक्ष, अकोला यांचा फोन क्रमांक तसेच ऑटो चालक यांनी त्यांचे ऑटो व टॅक्सी चालक यांनी त्यांचे ॲटो-टॅक्सीमध्ये चालकाचे नांव, पत्ता व मोबाईल फोन क्रमांक तसेच चालक किंवा मालक यांचे छायचित्र गाडीतील प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी लावणे बंधनकारक केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com