Akola News : अकोला आणि वऱ्हाडातील जिल्ह्यांमध्ये अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे जाळे सक्रिय असल्याचे उघड झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही स्थिती अधिकच गंभीर होत आहे.
अकोला : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदरावर सावट पडले असून, अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या घटनांनी हे सावट अधिक गहिरे होत आहे.