Akola : उद्धव सेनेच्या मशाल चिन्हाची मिरवणूक

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून बाईक रॅली
Uddhav thackeray faction symbol
Uddhav thackeray faction symbol esakal

मानोरा : तालुक्यात हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना घराघरात पोहचविण्यासाठी मशाल या निशाणीची बाईक रॅली मिरवणूक दि.१६ ऑक्टोबर रोजी गावातील ग्रामदेवता गणपती मंदिरातून रॅलीला सुरुवात केली तर ही रॅली तालुकाभर गावागावात काढून तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील संत सेवालाल महाराज, संत डॉ. रामराव महाराज यांच्या समाधीस्थळी मशाल या चिन्हांचे विधिवत पूजन करून धर्मगुरू बाबूसिंग महाराज, महंत कबिरदास महाराज, सुनील महाराज यांच्या उपस्थितीत उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आशिर्वाद घेतला.

Uddhav thackeray faction symbol
Akola : आ.प्रकाश भारसाकळेकडून पूर परिस्थितीची पाहणी

यावेळी मानोरा या तालुक्याच्या ठिकाणापासून बाईक रॅलीला सुरुवात झाली. रॅली मानोरा येथून पोहरादेवी येथे पोहोचली असता महंतांच्या हस्ते मशाल निशाणीचे विधिवत पूजन करून फुलउमरी येथील महंत यशवंत महाराज यांच्या येथून गव्हा येथील अंबिका मातेच्या येथे समारोप करण्यात आला. यावेळी महंत बाबुसिंग महाराज, महंत कबीर महाराज, सुनिल महाराज, युवा सेना विदर्भ सचिव सागर देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख जुबेर मोहनावाले, तालुका प्रमुख रविंद्र पवार, उध्दव सेनेचे पदाधिकारी डॉ. सुभाष राठोड, युवासेना उपजिल्हा प्रमुख शाम राठोड आदीसह जिल्हा भरातील आजी, माजी पदाधिकारी, शिवसेना, युवासेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com