
Akola : आ.प्रकाश भारसाकळेकडून पूर परिस्थितीची पाहणी
सिरसोली : सिरसोलीसह परिसरात ता. १० व ११ ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झाली. यामध्ये शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. सदर नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी आ.प्रकाश भारसाकळे यांनी करून सर्व शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला.
हेही वाचा: Akola : गुंठेवारी नियमानुकूल आता ऑफलाइन पद्धतीने
तेल्हारा तालुक्याततील जवळपास २१ गावात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान करून दोन हजार ७६५ हेक्टर आर क्षेत्रफळ बाधित झाल्याचा अहवाल कृषी विभाग व महसूल विभागाकडून जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनास पाठविण्यात आल्याचे आ. भारसाकळे यांना यावेळी सांगितले.
हेही वाचा: Akola : ६० हजार शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा!
आर्थिक मदतीपासून कोणताही शेतकरी सुटता कामा नये, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सर्व याद्या ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान येथील भोपळे वाडीतील रस्ता हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने तो तत्काळ करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. तो रस्ता ही पूर्ण करण्याचे वचन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.