अकोल्याची बॉक्सर दाखविणार जॉर्डनमध्ये बॉक्सिंगचा दम‘

पलक’ झांबरे करणार भारतीय संघाचे प्रतिनिधित्व
Boxer
Boxersakal

अकोला :आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शनाच्या जोरावर रायगड, हरियाणासह विविध ठिकाणी बॉक्सिंगच्या (boxing Punch )पंचने अनेक स्पर्धकांना पाणी पाजणारी अकोल्याची महिला बॉक्सर पलक झांबरे ही अमन (जॉर्डन) (Jordan) येथे होऊ घातलेल्या एशियन ज्युनियर चँम्पियनशीप (Asian Junior Championships)स्पर्धेत पुन्हा विरोधकांना आपला दम दाखविण्यासाठी सज्ज झाली आहे. ती भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Boxer
CM चन्नींच्या नातेवाईकांवरील छाप्यात ईडीकडून कागदपत्रे, मोठी रक्कम जप्त

अमन (जॉर्डन) येथे पुढील महिन्याच्या २७ तारखेपासून १५ मार्च दरम्यान सुरू होणाऱ्या एशियन ज्युनियर चँम्पियनशीप स्पर्धेत भारतीय महिला संघात पलक झांबरे खेळणार आहे. नुकत्याच नॅशनल बॉक्सिंग अकॅडमी हरियाणा (रोहतक) येथे भारत खेळ प्राधिकरण व बॉक्सिंग पेडरेशन ऑफ इंडिया व्दारा २ ते ६ जानेवारी दरम्यान झालेल्या एशियन चँम्पियन व आंतराष्ट्रीय स्पर्धेत ४० किलो वजन गटात अंतिम सामन्यात दमदार खेळाचे प्रदर्शन करून प्रतिस्पर्धी खेळाडूवर वर्चस्व मिळवून महाराष्ट्र संघाला विजेतेपदक मिळवून दिले होते. याआधीही रायगड (सांगली) येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धेतही विरोधी खेळाडूला सामन्यात कोणतीही संधी न देता सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. पलक सरबियामध्ये १८ ते २८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या नॅशनल चषक स्पर्धेतही भारतीय संघाकडून खेळणार आहे. प्रभात किड्समध्ये शिक्षण घेणारी पलक झामरे स्थानिक वसंत देसाई क्रीडांगणामधील क्रीडा प्रबोधनी, बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रात राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात बॉक्सिंगचे धडे घेत आहे.

Boxer
बारा आमदारांच्या निलंबनप्रकरणाची सुनावणी पूर्ण; सुप्रीम कोर्टानं निर्णय ठेवला राखून

अभिनंदनाचा वर्षाव

क्रीडा विभागीय आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी नीमा अरोरा, अमरावतीचे उपसंचालक विजय सावंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय जाधव, क्रीडा अधिकारी दिनकर उजळे, गणेश कुलकर्णी, अमरावती विभागाचे सचिव ॲड.विजय शर्मा आणि क्रीडा प्रबोधनीतील खेळाडूंनी भारतीय संघात निवड झालेल्या पलकचे अभिनंदन केले आहे.

क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून सतीशचंद्र भट्ट चांगले खेळाडू निर्माण करत आहेत. त्यांच्या प्रशिक्षात अनेक खेळाडूंनी राज्य, आंतराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे. ती चांगले प्रदर्शन करून भारतीय संघाला पदक मिळविण्यास प्रयत्न करणार.

- विजय जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी

Boxer
पुणे : बांधकाम व्यावसायिकाला शासकीय खोदाई शुल्क, ३८ लाखाचे नुकसान

क्रीडा प्रबोधनीचे खेळाडू विविध ठिकाणी अकोल्याचे नाव उज्वल करीत आहेत. भविष्यातही राज्य क्रीडा प्रशिक्षक सतीशचंद्र भट्ट चांगले खेळाडू घडवतील. स्थानिक नागरिकांच्या सहकार्यानेच प्रबोधनी चांगले काम करीत आहे.

-विजय संतान, क्रीडा उपसंचालक, अमरावती.

आपल्या मेहनतीच्या जोरावर पलकने आंतराष्ट्रीय भारतीय संघात आपली दावेदारी सिद्द केली आहे. या स्पर्धेतही ती चांगले प्रदर्शन करून आपल्या संघाला विजयी करणार.

-सतीशचंद्र भट्ट, राज्य क्रीडा प्रशिक्षक, अकोला.

सतीशचंद्र भट्ट सराच्या मार्गदर्शनत बॉक्सिंगचे चांगले धडे मिळाले आहे. त्यांनी शिकविलेल्या प्रत्येक मुद्याचे आजपर्यंत मला फायदा झाला आहे. भविष्यातही त्यांच्या मार्गदर्शनात खेळाचे चांगले प्रदर्शन करून त्यांनी ठेवलेल्या विश्‍वासावर उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे.

-पलक झांबरे, बॉक्सर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com