उन्हाच्या झळा वाढायच्या आधीच घसरले केळीचे दर

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 15 January 2021

गेल्या साडेचार महिन्यांत करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाकडाउनमुळे जिल्ह्यातील केळीचा भावात घसरण आली होती. मात्र, आता सणासुदीचा काळ सुरू झाल्याने केळीला मागणी आहे. लॉकडाउनच्या तब्बल साडेचार महिन्यांनंतर जळगाव केळीला जवळपास १ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला होता.

चिखली (जि.बुलडाणा) : गेल्या साडेचार महिन्यांत करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लाकडाउनमुळे जिल्ह्यातील केळीचा भावात घसरण आली होती. मात्र, आता सणासुदीचा काळ सुरू झाल्याने केळीला मागणी आहे. लॉकडाउनच्या तब्बल साडेचार महिन्यांनंतर जळगाव केळीला जवळपास १ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाला होता.

चिखली तालुक्यात मोठ्याप्रमाणावर केळीच्या बागा असून, उत्पादनही चांगले आहे. परंतु, सध्या भावामध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे शेतकर्‍यांसमोर अडचण निर्माण राहिली आहे.

हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणूक; आपल्या गावकडे येणार का ही महिला अधिकारी ?, तिच्या सौदर्याची सगळीकडेच चर्चा!

जमीन सर्वच पिकांसाठी पोषक असल्याने केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पण केळीचे दर घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे बागायती पिकासह जिरायती हंगाम चांगलाच बहरला. परंतु ऐन कापणीच्या वेळेस अतिपावसाने मूग, उडीद आदी पिके हातची गेली. नंतर परतीच्या पावसाने सोयाबीन, ज्वारी, कापूस, तीळ आधी पिकांना मोठा फटका बसला. त्यापासून फळ बागाही सुटल्या नाहीत.

रात्रंदिवस एक करून लाखो रुपये खर्च करून केळीचे पीक लहानाचे मोठी केली; मात्र यावर्षी केळीचे घड कापणीला सुरुवात झाली तेव्हा केळीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

त्यामुळे केळीला कोणी घेवालच नव्हता. बाजारपेठेत केळीला केवळ दोनशे ते अडीचशे रुपये क्विंटलचा भाव होता. मधल्या काळात केळीच्या भावामध्ये थोडा सुधार झाला; मात्र पुन्हा केळीचे दर घसरले. आज साडेतीनशे ते साडे चारशे रुपये क्विंटल प्रमाणे केळीला मागणी होत आहे. या भावात केलेल्या खर्चाचा विचार करता विकणे परवडत नाही.

परिसरात तब्बल 25 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड करण्यात आली आहे. यंदा सुरुवातील चांगले उत्पन्न मिळाले. एकरी 350 ते 400 क्विंटल केळीचे उत्पादन यंदा शेतकर्‍यांना मिळत आहे.

मात्र, केळी बाजारात दाखल होताच केळीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. सुरवातीला खुल्या बाजारात 60 ते 80 रुपये डझन विकली जाणारी केळी सध्या 20 ते 30 रुपये डझनप्रमाणे विकली जात असल्याने खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - लसीची तयारी सुरू तरीही कोरोनाची भीती कायमच, नव्याने आढळले 38 पॉझिटिव्ह रुग्ण

उत्सवातील मागणीही घटली
गणपती, देवी या सणासुदीच्या काळात केळीला बऱ्यापैकी दर मिळतो; पण यावर्षी तसे घडले नाही. तेल्हारा तालुक्यातून प्रामुख्याने गुजरात, मध्यप्रदेश व अन्य प्रांतात केळी पाठवली जातात. पण परतीच्या पावसाने कापणीस आलेली केळी शेतामध्ये तशीच आहे. कटनी होत नाही व बाजारपेठेमध्ये देखील भाव नाहीत. काहींच्या केळीला घडे नाहीत. त्यावर रोगराई वाढली. या सर्व कारणांमुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana Marathi News- Banana prices fell even before the onset of summer