कोरोनाच्या काळातही सेनेचे माजी आमदार विरोधकाच्या भूमिकेतच

akola buldana news Even during the Corona era, the former Sena MLA remained in the role of opposition
akola buldana news Even during the Corona era, the former Sena MLA remained in the role of opposition

देऊळगाव राजा  ः कोरोना संसर्गाने सद्यस्थितीत मातृतीर्थ मतदार संघ होरपळून निघाला आहे. विकासकामे होत राहतील. आयुष्य असलं तर पुढे राजकारण करू मात्र ही वेळ कोरोनाशी लढा देण्याची आहे. असे भावनिक विधान पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले असताना माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते शशिकांत खेडेकर यांच्याकडून राजकारणासाठीचे राजकारण सुरू असल्याचे अलीकडील काळात दिसून येत आहे.

दरम्यान शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेल्या राष्ट्रवादीसोबत मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी पुढाकार घेण्याची गरज असताना ते नेमके सत्तेत आहे की, विरोधात हे कळायला मार्ग नाही.

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सत्तेवर आणि राज्यातील राजकारणाचे नवे समीकरण पुढे आले. महाआघाडीच्या सरकार स्थापनेनंतर राज्यात कोरोना नावाचा भयंकर संकट आवासून उभे राहिले.

एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संकटाशी पूर्ण ताकतीने लढा देत असून, मातृतिर्थ बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या खांद्यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री पदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी असल्याने तेही कोरोना सारख्या गंभीर संसर्गाला हद्दपार करण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत.

मागील आठवड्यात त्यांनी जिल्हाभरात आढावा बैठका घेऊन जिल्ह्यातून कोरोना संकटाचा नायनाट करण्यासाठी प्रशासनाच्या मदतीने लढा देत आहे. दरम्यान विकास कामे होतच राहतील कोरोनाच्या संकटाशी लढा देत असताना पुढे आयुष्य असले तर राजकारणही करू मात्र, सध्या आपले लक्ष फक्त कोरोनाशी आहे. असे भावनिक विधान केले. त्यांचे हे विधान राजकीय दृष्टिकोनातून एक प्रकारे सुचकच होते.

जिल्ह्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले असताना आरोप-प्रत्यारोप किंवा राजकारणासाठीचे राजकारण बाजूला सोडा असे एक प्रकारे सूचक आवाहन त्यांनी केले होते. अशा काळात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सिंदखेडराजा मतदार संघात बेकायदेशीर रेती उत्खनन संदर्भात निवेदन देऊन प्रशासनासह त्यांचे राजकीय विरोधक असलेले अन्न व औषध प्रशासन मंत्र्यावर टीका केली.

तालुका शेतकी खरेदी विक्री संघामार्फत होत असलेल्या हरभरा खरेदीत भ्रष्टाचाराचा मुद्दा व महसूल विभागामार्फत होणाऱ्या मका खरेदीत अनियमिततेचा आरोप करून त्यांनी पालकमंत्र्यांवर शरसंधान केले. ऐवढेच नव्हे तर वळण रस्त्यावर होणाऱ्या अपघाताला जबाबदार धरत त्यांनी जाफ्राराबाद चौफुलीवर स्पीड ब्रेकर लावण्यासाठी निवेदन दिले.

या निवेदनाचा आधार घेत तालुकास्तरीय काही शिवसेना पदाधिकार्‍यांनी सोशल मीडियावर लोकप्रतिनिधी विरुद्ध मोर्चा उघडला. अलीकडील काळात माजी आमदार शशिकांत खेडेकर व काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात शिवसेना नेमकी सत्तेत आहे की, विरोधात हे कळायला मार्ग नाही?. याच बरोबर माजी आमदार यांनी किरकोळ विषयात लक्ष घालून राजकारण करण्याची ही वेळ नाही.

तालुकास्तरीय नेत्यांनी अथवा पदाधिकाऱ्यांनी असे प्रश्न हाताळले असते तर ठीक मात्र, मतदार संघात जिजाऊ जन्मस्थळ विकास, खडकपूर्णा बाधीत शेतकऱ्यांचे प्रश्न, सामान्य नागरिकांसाठी आरोग्य संदर्भातील समस्या, औद्योगिक विकास संदर्भातील अनेक प्रश्न असताना मतदार संघाच्या विकासासाठी पालकमंत्र्यांच्या हातात हात घालून विकासात्मक दृष्टीने पुढे जाण्याची गरज असून, अलीकडील काळात माजी आमदार खेडेकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मतदारसंघातील सर्वसामान्य जनता बुचकळ्यात पडली आहे.

संकट समयी राजकारण हे मतदारसंघाचे दुर्दैव आहे. जिजाऊ माँ साहेबांच्या बुलढाणा जिल्ह्यात विकासात्मक राजकारण अपेक्षित आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात प्रशासन कोरोनाशी झुंज देत आहे. पालकमंत्री अहोरात्र जिल्ह्यावर आलेले संकट दूर करण्यासाठी झगडत आहे. ही वेळ सोबत राहून नागरिकांच्या आरोग्यासाठी काम करण्याची आहे. अशा काळात कोणीही राजकारण करू नये मात्र, विकासाच्या विचाराने गेली पाच वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून कार्य केलेले माजी आमदार यांची भूमिका दुर्दैवी आहे.
-मनोज कायंदे, जिल्हा परिषद सदस्य, बुलढाणा.
(संपादन - विवेक मेतकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com