esakal |  पाच पालिका प्रतिबंधित, जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana News Five municipalities banned, all shops except essentials closed

जिल्ह्यातील बुलडाणा शहर, चिखली शहर, मलकापूर शहर, खामगाव शहर व देऊळगाव राजा शहर येथे कोरोना बाधीतांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

 पाच पालिका प्रतिबंधित, जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा   : जिल्ह्यातील बुलडाणा शहर, चिखली शहर, मलकापूर शहर, खामगाव शहर व देऊळगाव राजा शहर येथे कोरोना बाधीतांच्या संख्येत सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, मलकापूर, चिखली व देऊळगाव राजा नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर प्रतिबंधात्मक क्षेत्रासाठी आज (ता.22) सायंकाळी 6 वाजेपासून 1 मार्चचे सकाळी 8 वाजेपर्यंत निर्बंध लागू करण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिले आहे.

हेही वाचा - यंदाचा उन्हाळाही घरात काढण्याचे संकेत,  जिल्हा लॉक डाउनच्या दिशेने!


ग्राहकांनी दुकानामध्ये खरेदी करण्याकरिता जवळपास असलेल्या बाजारपेठा, अतिपरिचित दुकानदार यांचा वापर करावा. शक्यतो दूरचा प्रवास टाळावा. सर्व प्रकारची उपाहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधेस परवानगी असणार आहे. लग्न समारंभाकरीता 25 व्यक्तींना तहसीलदारांकडून परवानगी अनुज्ञेय असणार आहे. सर्व प्रकारची शैक्षणिक संस्थांमध्ये अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तर पत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे आदी कामांकरिता परवानगी असणार आहे. मालवाहतूक सुरू राहणार, सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक अतिआवश्यक कामासाठी संबंधित क्षेत्रातील पोलिस निरीक्षक यांची पूर्व परवानगी घेऊन अनुज्ञेय असणार आहे. ठोक भाजी मंडई सकाळी 3 ते 6 या कालावधीत सुरू असणार आहे. मात्र, सदर मंडईत किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षक गृहे व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहणार आहेत. तसेच सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व स्नेहसंमेलन या कालावधीत बंद असतील. सर्व धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सर्व आठवडी बाजार बंद राहतील. या आदेशांचे उल्लंघन केल्यास कायद्यान्वये कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

हेही वाचा - हॉटेल बंद, पार्सल सुविधाच मिळणार, लग्न समारंभाकरिता २५ व्यक्तींना परवानगी

 असे राहील वेळापत्रक
आदेशान्वये प्रतिबंधित क्षेत्रात किराणा, स्वस्त धान्य दुकाने, फळे व भाजीपाला, दूध, औषधे, पीठ गिरण्या सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत  सुरू राहणार आहे. दूध विक्रेते, दूध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारच्या बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील. या प्रतिबंधित क्षेत्रात रात्री 8.30 ते दुसर्‍या दिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. या क्षेत्रात ज्या उद्योगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे. ते सर्व उद्योग सुरू ठेवण्याकरिता परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालये, बँका अत्यावश्यक सेवा वगळून 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू राहतील. सर्व बँका नियमितपणे सुरू राहतील. प्रतिबंधित क्षेत्र वगळून सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. आठवड्या अखेर शुक्रवारी सायं 5 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बंद राहतील. तसेच दूध विक्रेते, डेअरी यापुढे सकाळी 6 ते दुपारी 3 व सायं 6 ते रात्री 8.30 वाजे पर्यंत नियमितपणे सुरू असतील.

अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

घोटाळ्याप्रकरणी हिवरखेडच्या दोन माजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यावर गुन्हा...

आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 जणांवर गुन्हा दाखल

पालकमंत्री बच्चू कडू यांना पुन्हा कोरोना झाला कसा?

Coronavirus; आता कठोर निर्णय, बदलेल्या विषाणूचा वाढतोय अकोल्यात संसर्ग!

खमंग वऱ्हाडी रोडगे वर तुपाची धार; पार्टीचा बेत होऊच द्या आता!

loading image