Video : स्वतःला जमिनीत गाडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांचे आंदोलन

सकाळ वृत्तसेेवा
Wednesday, 23 September 2020

बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या अतिपावसाने 10 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी,  मका, ज्वारी व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  गेल्या वर्षी ही पावसाने खरीप व रब्बी हंगाम पूर्णतः हातून गेला होता.  

अकोाला: बुलडाणा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या अतिपावसाने 10 हजार हेक्टर पेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कपाशी,  मका, ज्वारी व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.  गेल्या वर्षी ही पावसाने खरीप व रब्बी हंगाम पूर्णतः हातून गेला होता.  

यावर्षीही अतिपावसाने शेतकरी उध्वस्त झाला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना एक रुपयांची ही मदत मिळाली नाही. पंचनामे झाले नाही. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. शेतकऱ्यांना सरकारकडून हेक्टर 25 हजार रुपये मदत मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यामधील परडा शिवारात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात आंदोलनाला सुरुवात केली आहे. ते स्वतः ला गाडून घेऊन आंदोलन चालू केले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ आली तरी अद्यापही बँकेने पीककर्जाचे वाटप केले नाही. शेतकऱ्यांची पीककर्जाची प्रकरणे मोठ्या संख्येन प्रलंबित आहे. सदर प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावून पीककर्ज वाटप करा, अन्यथा पीककर्जाची प्रकरणे निकाली काढा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News: Ravikant Tupkar agitation of Swabhimani Shetkari Sanghatana by burying himself in the ground