esakal | शिवसेनेकडून तीनवेळा आमदार झालेले विजयराज शिंदे समर्थकांसह गेले भाजपमध्ये
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana News Vijayraj Shinde, a three-time MLA from Shiv Sena, joined BJP with his supporters

बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व करणारे व पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढविणारे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे व आताच्या ‘वंचित’ आघाडीतील नेते विजयराज शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

शिवसेनेकडून तीनवेळा आमदार झालेले विजयराज शिंदे समर्थकांसह गेले भाजपमध्ये

sakal_logo
By
अरूण जैन

बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा नेतृत्व करणारे व पाच वेळा विधानसभेची निवडणूक लढविणारे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे व आताच्या ‘वंचित’ आघाडीतील नेते विजयराज शिंदे यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या सागर निवासस्थानी मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संजय कुटे, जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर, चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले, भाजपचे बुलडाणा विधानसभा क्षेत्र प्रमुख योगेंद्र गोडे आदी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

या नेत्यांच्या उपस्थितीत श्री शिंदे यांनी प्रामुख्याने शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख महिला आघाडी तथा नगरसेविका सिंधुताई खेडेकर,बाजार समितीचे माजी संचालक शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अर्जुन दांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम नारखेडे, पुरुषोत्तम लखोटीया, माजी उपसभापती पंचायत समिती मोताळा कृष्णा भोरे, बुलडण्याचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले, माजी नगरसेवक संजय नागवंशी, समाधान राऊत, गणेश पाटील, सागवानच्या सरपंच कांताबाई राजगुरे, गुळभेलीचे सरपंच तुकाराम राठोड, ज्ञानेश्वर राजगुरे, सचिन शेळके, अशोक किंन्होळकर, मो सोफियान, रहीम शाह, हेमंत जाधव, वैभव ठाकरे, राजेश सुरपाटणे,वअविनाश शेंडे, सुनील काटेकर यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला.

या प्रवेशाचे वृत्त बुलडाण्यात येताच श्री. शिंदे यांच्या समर्थकांनी स्थानिक जयस्तंभ चौकात फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले.

विजयराव शिंदे हे जुने जाणते व अनुभवी नेतृत्व आहे. त्यांच्या भाजपमध्ये येण्याने पक्ष मजबूत होईल तसेच पक्षाला आगामी काळात निश्चितच फायदा होईल.

-आकाश फुंडकर, आमदार

खामगाव तथा जिल्हाध्यक्ष भाजपा. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला भाजपमध्ये संधी दिली या संधीचे आपण सोने करून दाखवू व पक्षासाठी सर्वस्वी निष्ठेने काम करू अशी ग्वाही देतो.
-विजयराज शिंदे, माजी आमदार बुलडाणा.
(संपादन - विवेक मेतकर)

loading image