esakal | Buldhana: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले प्रशासन; बाधितांची आशा पल्लवीत
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले प्रशासन

बुलडाणा : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले प्रशासन; बाधितांची आशा पल्लवीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

घाटबोरी (जि. बुलडाणा) : मेहकर तालुक्यासह जिल्ह्यात अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. तेव्हा शेतकर्‍यांना पिकवार नुकसान भरपाई मिळायला हवी अशी मागणी शेतकरीवर्ग सरसकट नुकसान भरपाईसाठी शासनाकडे आर्त हाक देत आहेत.

जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रचलित निकषानुसार ९१२४.०७ कोटी रुपयाची निधीची सरकारकडे अपेक्षित मागणी केली आहे. पंचनाम्यानुसार मेहकर तालुक्यात १०,४८५ शेतकरी बाधित असून १,१७३२.४७ हेक्टर क्षेत्र आहे.तर मेहकर तालुक्यासह जिल्हातील बाधित शेतकरी १,३२,६४३ असून यांच्या १३३७५५.८२ हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टी व पुराचा बाधा पोहचला आहे.

हेही वाचा: Pune : जांभूळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; एक ठार, एक गंभीर

त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शासनाकडे ९१२४.०७ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.राज्यसरकारने बुधवारी (ता.१३) मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर नुकसान भरपाई देण्याची घोषणा केल्यामुळे जिल्हातील बाधित शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईसाठी १ लाख ३२ हजार ६४३ शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.इतर शेतकरी भ्रमनिराश होणार आहेत. त्यामुळे यांना सरसकट मदतीची अपेक्षा आहे.जिल्ह्यात मागील महिन्यात अनेकदा अतिवृष्टी झाली,पिकाच्या पेरणीनंतर अधिक काळ पावसाने ओढ दिली.

त्यानंतर पावसाने सुरवात केली तर उभ्या तसेच काढणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाले.काही ठिकाणी अतिवृष्टिमुळे जमिनी खरडून गेल्या तर असंख्य शेतकर्‍यांच्या शेतात पाणी साचल्याने उभ्या सोयाबीन पिकाची माती झाली.त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे पूर्ण केले त्यानंतर निकषानुसार नुकसान झालेल्या पिकांची तसेच जमिनीच्या नुकसानीची भरपाई निश्‍चित करण्यात आली.त्यानुसार सरकारकडे भरपाईसाठी निधीची मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे शेतकर्‍यांना विविध नुकसानीला समोरे जावे लागत आहे त्यामध्ये सर्वांत प्रथम मुंग, उडीद,तीळ,सोयाबीन,तुर, कपाशी,पिकावर वेगवेगळ्या पिकाचे अतिवृष्टिमुळे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यांना शासनाने आर्थिक मदत देण्याची गरज आहे.

हेही वाचा: आव्हाडांऐवजी दुसऱ्या कुणाला त्वरित जामीन मिळाला असता का? - राम कदम

अद्ययावत माहिती केली सादर

मेहकर तालुक्यात १६८ गावात ६४ हजार ७२७ शेतकरी असून यापैकी जिल्हा प्रशासनाने १०,४८५ शेतकरी अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान भरपाईसाठी पात्र दाखवले आहेत.तर एकूण जिल्ह्यात १,४७७ गावांत ५ लाख ४१ हजार २४ शेतकरी असून यापैकी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १ लाख ३२ हजार ६४३ शेतकर्‍यांची अतिवृष्टी व पुरामुळे पिकनुकसान झाल्याची माहिती राज्यशासनाकडे पाठवली आहे त्यामुळे इतर शेतकरी नुकसान भरपाईसाठी भ्रमनिराश होऊन मदतीपासुन वंचितच राहणार आहेत हे एक विशेष...

loading image
go to top