पोटनिवडणुकीची धामधूम; शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola by election Application process from Friday State Election Commission Candidature for 207 vacant posts 125 Gram Panchayats

पोटनिवडणुकीची धामधूम; शुक्रवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया

अकोला : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार १२५ ग्रामपंचायतींच्या २०७ रिक्त पदांकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार (ता. १३) पासून सुरू होणार आहे. जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १२५ ग्रामपंचायतींच्या २०७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया १३ मे पासून सुरू होईल.

२० मे पर्यंत उमेदवारांना सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ मे रोजी करण्यात येईल, तर २५ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. तसेच निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करण्याची तारीख २५ मे दुपारी ३ वाजतानंतर असून आवश्यकता असल्यास ५ जून रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर ६ जून रोजी मतमोजणी करण्यात येईल. ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

Web Title: Akola By Election Application Process From Friday State Election Commission Candidature For 207 Vacant Posts 125 Gram Panchayats

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top