esakal | अकोला: कार चालकाचे नियंत्रण सुटले; दोन जण जागीच ठार । Accident
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला: कार चालकाचे नियंत्रण सुटले; दोन जण जागीच ठार

अकोला: कार चालकाचे नियंत्रण सुटले; दोन जण जागीच ठार

sakal_logo
By
मयूरी चव्हाण -काकडे -सकाळ वृत्तसेवा

बार्शीटाकळी (जि. अकोला) : महान ते शेलूबाजार दरम्यान कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात अकोल्यातील वैभव ढोरे व परतवाडा येथील धीरज अग्रवाल या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. सोमवार, ता. ४ सप्टेंबरला पहाटे ५ वाजता झालेल्या या अपघातात दोन जन गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

हेही वाचा: खडकवासला: सालाबादप्रमाणे यंदाही खडकवासल्यात 'गोधडी महोत्सव'

अकोल्यातील खोलेश्वर येथील रहिवासी परीमल कारीया, गड्डम प्लॉट येथील रहिवासी कुशल बगडीया, मोठी उमरी येथील रहिवासी वैभव ढोरे व परतवाडा येथील रहिवासी धीरज अग्रवाल हे चौघे त्यांच्या कारने अकोल्यावरुन महानमार्गे शेलूबाजारकडे जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार वेगात झाडावर आदळली.

त्यामुळे या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात मोठी उमरी येथील रहिवासी वैभव ढोरे व परतवाडा येथील रहिवासी धीरज अग्रवाल या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. खोलेश्वर येथील रहिवासी परीमल कारीया, गड्डम प्लॉट येथील रहीवासी कुशल बगडीया हे दोघे गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना तातडीने शेलुबाजार येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अकोल्यात आणण्यायात आले.

दोघांवरही अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंजर व मंगरूळपीर तसेच शेलुबाजार पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. जखमींना उपचारासाठी पाठविले.

loading image
go to top