अकोला : कोविड लसीकरणास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

अकोला : कोविड लसीकरणास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा!

अकोला ः कोविड लसीकरणाचे लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’, ही मोहीम सुरू करण्यात आली असून, मोहिमेला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे. यासंदर्भात मंगळवारी (ता. १६) जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीत त्यांनी यंत्रणांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले.

जिल्हा टास्क फोर्स समितीच्या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो-पटोकार, तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देण्यात आली गत १० तारखेपासून लसीकरणाची विशेष मोहीम सुरु झाली असून लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसादही मिळत आहे.

हेही वाचा: कोरोनाबाबत माहिती न देणं पडलं महाग; 'ॲमझॉन'ला पाच लाखांचा दंड

गत पाच दिवसांत पहिला डोस घेतलेल्या व्यक्तींचे प्रमाण आता ५९ टक्के झाले असून दोन्ही डोस घेतलेल्या लोकांचे प्रमाण २७.२१ टक्के आहे. लोकांना लसीकरणाचे फायदे समजावणे, लोकांना आवाहन करणे, त्यासाठी प्रत्यक्ष कॉल करणे इत्यादी उपाययोजनांसोबत रेडिओ व अन्य माध्यमांद्वारे जनजागृती करणे या उपायांचा अवलंब जनजागृतीसाठी करण्यात येत आहे.

ग्रामपातळीवर तसेच शहरातही स्थानीक यंत्रणांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून त्यांना लसीकरणाचे फायदे समजावून सांगावे, असे निर्देश अरोरा यांनी दिले.

loading image
go to top