

Akola Municipal Results Highlight BJP’s Edge, Others Falter
Sakal
-योगेश फरपट
अकोला: महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे तो म्हणजे, या निवडणुकीत बड्या नेत्यांची नावे, दौरे आणि राजकीय वजन फारसे उपयोगी ठरले नाही. प्रत्यक्ष मैदानातील संघटन, स्थानिक समीकरणे आणि मतांचे गणित याच घटकांनी निकाल ठरवले. सर्वाधिक जागा जिंकून भाजप अव्वल ठरली तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांना फाजिल आत्मविश्वास आणि गटबाजीचा मोठा फटका बसला, तर काँग्रेस, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीने परिस्थितीचा नेमका फायदा उचलला.