
Akola Congress
Sakal
अकोला : अकोल्यातील काँग्रेस पक्षात सध्या ‘रणनिती’पेक्षा ‘प्रेझेन्टेशन’ महत्त्वाचं झालंय, अशी चर्चा खुद्द पक्षाच्या कार्यकर्त्यांतून सुरू आहे. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष सशक्त करण्याऐवजी ‘पेपरवरची प्रगती’ दाखवण्यातच जिल्हाध्यक्ष व्यस्त असल्याची नाराजी तळागाळातून व्यक्त होत आहे. जिल्हाध्यक्ष हे कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक न ठरता ‘शोप पिस’सारखे कार्यक्रमात वावरतात, आयत्या मंचांवर भाषण झळकवतात, मात्र जमिनीवर कामाची शून्यता दिसते, अशी बोचरी टीका काँग्रेसच्या आतल्या गोटात केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसला आता ‘अंमलबजावणीचा नेता’ हवा असून गप्पांचा जिल्हाध्यक्ष नको अशीही भावना व्यक्त होत आहे.