Akola
esakal
योगेश फरपट, अकोला
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण वेगाने बदलत असताना, अकोल्यात मात्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीमधील संभाव्य युती अडचणीत सापडल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. मुंबईत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत युतीची घोषणा करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असली, तरी अकोल्यात गेल्या पाच दिवसांपासून काँग्रेसकडून केलेल्या प्रयत्नांना वंचितकडून कोणताही ठोस किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही, ही वस्तुस्थिती समोर आली आहे.