कोरोनाने ओलांडला एकोणविसशेचा टप्पा!  पुन्हा एक बळी; 22 नवे पॉझिटिव्ह; 36 रुग्णांची कोरोनावर मात

सुगत खाडे  
Tuesday, 14 July 2020

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाने जिल्ह्यात सोमवारी (ता. 13) पुन्हा एकाचा बळी घेतला. त्यासोबतच 22 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 901 झाली असून मृतकांची संख्या 95 झाली आहे. याव्यतिरीक्त 36 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सोमवारी घरी सोडण्यात आले.

अकोला  ः जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 रोगाने जिल्ह्यात सोमवारी (ता. 13) पुन्हा एकाचा बळी घेतला. त्यासोबतच 22 नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 901 झाली असून मृतकांची संख्या 95 झाली आहे. याव्यतिरीक्त 36 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सोमवारी घरी सोडण्यात आले.

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यासोबतच मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचा आकडा सुद्धा वाढताना दिसून येत आहे. सोमवारी (ता. 13) जिल्ह्यातील 316 संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 22 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले, तर 294 अहवाल निगेटिव्ह आले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 22 नव्या रुग्णांची भर पडल्यामुळे आता जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 901 झाली आहे. दरम्यान पातूर येथील 52 वर्षीय पुरुष रुग्णांचा सोमवारी (ता. 13) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेताना
मृत्यू झाला. संबंधित रुग्णाला 1 जुलैरोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. असे असले तरी सोमवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, कोविड केअर सेंटरमधून 19, आयकॉन हॉस्पिटल मधून पाच व हॉटेल रिजेन्सी येथून चार अशा 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे सध्या प्रत्यक्षात 258 रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

सीबीएसई बारावी परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थी चमकले 

दहा महिला व 12 पुरुष पॉझिटिव्ह
सोमवारी 22 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात 10 महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तीन जण पातूर येथील, दोन जण नवीन बसस्टॅण्ड जवळ, दोन जण गोरक्षण रोड, दोन जण अकोट, 9 जण मूर्तिजापूर येथील व उर्वरीत प्रत्येकी एक रुग्ण गंगानगर, तेल्हारा, महान, खडकी येथील रहिवासी आहेत.

Video: अरे हे काय? पेट्रोल दिलं नाही म्हणून चक्क ऑफिसमध्येच सोडले कोब्रा नाग 

अशी आहे रुग्णांची स्थिती
- आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह - 1901
- एकूण बळी - 95
- डिस्चार्ज - 1548
- उपचार सुरु - 258

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola Corona crosses the twenty-ninth stage! Again a victim; 22 new positives; Overcoming corona of 36 patients