coronavirus: आणखी ३४० पॉझिटिव्ह, दोघांचा मृत्यू

Akola Corona News coronavirus: 340 more positive, both die
Akola Corona News coronavirus: 340 more positive, both die

अकोला :  जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेखच वाढत आहे. बुधवारीसुद्धा कोरोना संसर्ग तपासणीचे १६३७ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३४० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दिवसभरात दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त अहवालानुसार बुधवारी सकाळी २३४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यात १०४ महिला व १३० पुरुषांचा समावेश आहे. सर्वाधिक ४९ रुग्ण अकोट येथील असून, अकोला एमआयडीसी व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी १४, डाबकी रोड येथील ११, जीएमसी येथील १०, केशव नगर व सुकली येथील प्रत्येकी आठ, गोरक्षण रोड व कौलखेड येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी व पोपटखेड येथील प्रत्येकी पाच, देवळी, रामदासपेठ व गणेश नगर येथील प्रत्येकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

याशिवाय शहराच्या इतर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठी आहे. सायंकाळी १०६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ४५ महिला व ६१ पुरुषांचा समावेश आहे. त्यात मुर्तिजापूर येथील १२, डाबकी रोड येथील सात, सिरसो येथील सहा, हिरपूर, बाळापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, भौरद, कौलखेड व मलकापूर येथील प्रत्येकी चार, न्यु राधाकिसन प्लॉट, जयहिंद चौक, दहिहांडा, व वानखडे नगर येथील प्रत्येकी तीन रुग्णांसह इतर परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये ४५ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
.................
१०६ जणांना डिस्चार्ज
बुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १८, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून सहा, हॉटेल स्कायलार्क येथून एक, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून आठ, हॉटेल रिजेन्सी येथून चार, अवघाते हॉस्पिटल येथून चार, होम आयसोलेशन येथून ६२ असे एकूण १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
..........................
दोघांचा मृत्यू
बुधवारी दोघांचा मृत्यू झाला. त्यात वाशिंबा बोरगाव मंजू येथील रहिवासी असलेल्या ५८ वर्षीय पुरुष रुग्ण आहे. या रुग्णास ता.१३ रोजी दाखल करण्यात आले होते. दुसरा रुग्ण माना ता.मूर्तिजापूर येथील ७३ वर्षीय पुरुष आहे. त्यास ता.२३ रोजी दाखल करण्यात आले होते.
.............................
ॲक्टिव्ह रुग्ण अडीचहजारांवर
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. सध्या जिल्ह्यात एकूण २६६३ रुग्णांवर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या १४ हजार ८०३ आहे. त्यातील ३५९ जणांचा मृत्यू झाला आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com