esakal | अरे देवा ! पातूर तालुक्यात गेला कोरोनाचा पहिला बळी
sakal

बोलून बातमी शोधा

death.jpg

43 वर्षीय रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती सदर महिला ही 14 जून रोजीच्या अहवालात पॉझिटिव्ह आली होती. या महिलेचा शनिवार (ता.20) दुपारनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे परत एकदा शहरवासियांच्या चिंतेत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अरे देवा ! पातूर तालुक्यात गेला कोरोनाचा पहिला बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पातूर (जि. अकोला) : गेल्या काही दिवसांपूर्वी अकोल्याच्या नायगाव येथील कोरोना बाधित रुग्णाच्या अंतिम संस्कारासाठी गेलेली समी प्लॉटमधील 43 वर्षीय रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे तिला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीअंती सदर महिला ही 14 जून रोजीच्या अहवालात पॉझिटिव्ह आली होती. या महिलेचा शनिवार (ता.20) दुपारनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे परत एकदा शहरवासियांच्या चिंतेत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा- खुशखबर! प्लाझ्मा थेरपीसाठी तब्बल एवढ्या कोरोनामुक्तांची संमती; गंभीर कोरोनाबाधित रुग्णांचा जीव वाचण्यास होणार मदत

269 नागरिकांची आरोग्य तपासणी आरोग्य 
पातूर शहरातील शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील समी प्लॉटमधील 43 वर्षीय महिलेला श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे तिला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्या महिलेचा शनिवारी उपचारादरम्यान, मृत्यू झाला. तर परिसरातील आरोग्य सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून 86 कुटुंबातील 269 नागरिकांची आरोग्य तपासणी आरोग्य विभागाने केली आहे. सदर परिसरात ये-जा करण्यास मज्जाव करण्यासाठी प्रशासनाने चार ठिकाणी कंटेन्मेंट झोन उभारले असून, सदर महिलेच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. 

क्लिक करा- अरे बापरे! एकाच दिवशी पाच कोरोना बळी; या जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 64 वर

साखळी तोडण्याची आवश्‍यकता
आतापर्यंत पातूर व शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील एकूण 13 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले असून, 12 रुणांनी कोरोनावर मात केली. तर एकाचा मृत्यू झाला. दरम्यान आरोग्य, पोलिस व महसूल प्रशासन नागरिकांना वारंवार प्रशासनाने नेमून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी सूचित करत आहे. त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. ज्यातून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल. परिणामी कोरोनामुक्त वातावरणाच्या दिशेने तालुक्याची वाटचाल होऊ शकते.