Akola Crime : क्रुरतेचा कळस! सिगारेटचे चटके देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अकोला शहरातील खदान भागात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणानं १४ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला.
Crime
Crimesakal

अकोला - शहरातील खदान भागात राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणानं १४ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. सिगारेटचे चटके देत ब्लेडच्या साहाय्याने केसही कापले. एवढ्यावरच समाधान न झाल्याने त्याने तिला सलूनमध्ये नेत तिचे मुंडन केले. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या दिल्यानंतर पोलिसांनी अखेर युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

थरकाप उडविणारी ही घटना खदान पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कैलास टेकडी परिसरात घडली. परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर शेजारीच राहणाऱ्या व्यसनाधीन व गुंड प्रवृत्तीच्या युवकाने धमकावून अश्लील चाळे केले. या लहान मुलीवर तो जबरदस्ती करत होता. मुलीच्या वडिलांनी त्याला समजावले तर त्यांनाही त्याने जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ते तक्रार देण्यासाठी घाबरत होते.

परंतु, ता. १५ नोव्हेंबर रोजी विकृत युवकाने माणुसकीला काळीमा फासला. मुलीने नकार दिल्याने त्याने तिला घरातून बाहेर बोलाविले व ओढत ओढत जवळीलच स्मशानभूमीत नेले. तिला विवस्त्र केले, तिच्या हाताला शिगारेटने चटके दिले. हा प्रकार परिसरातील मुलांनी बघितल्याने तो तेथून निघून गेला. नंतर पुन्हा दारू पिऊन येऊन घरी जाऊन तिला जबरदस्तीने त्याच्या घरात नेऊन अत्याचार केला व तिचे केस कापले.

एवढे नव्हेतर एका सलूनमध्ये नेऊन तिचे टक्कल केले. हा सर्व प्रकार संध्याकाळी घरी आलेल्या आई-वडिलांना सांगितला. मात्र, युवकाने धमकी दिली, त्यामुळे हे कुटुंब तक्रार देण्यासाठी घाबरत होते. दोन दिवसांपासून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू होता.

अखेर ता. १७ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन महिला आघाडी प्रदेश महासचिव अरूणधंती शिरसाट यांना माहीत होताच, त्यांनी महिला पदाधिकारी प्रभाताई शिरसाट, पुष्पाताई इंगळे, वंदनाताई वासनिक, आम्रपालीताई खंडारे यांच्यासह सचिन शिराळे, गजानन दांडगे, गणेश सपकाळ, आशिष मांगुळकर, सुनंदाताई चांदणे यांना दिली व खदान पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्यास भाग पाडले.

प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेवून प्रभारी ठाणदेरा जाधव यांनी आरोपी गणेश कुंभरे याला ताब्यात घेतले. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपीविरुद्ध भादंवि ३६३, ३७६, ३५४, ३५४ ‘ब’, ३२३, ३२४, ५०६, कलम चार व आठ नुसार पोक्सोचा गुन्हा दाखल केला. रात्रीच मुलीची मेडीकल करून बालसुधारगृहात रवानगी केली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास खदान पोलिस करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com