Akola Crime: रस्त्यावर केक कापण्यापासून रोखलं म्हणून तरुणांचा नागरिकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला ! एकाला अटक

खदान पोलिस स्टेशन अंतर्गत मलकापूर येथे रविवार रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान वाढदिवसाचा केक कापण्यावरून वाद झाला.
Akola Crime: रस्त्यावर केक कापण्यापासून रोखलं म्हणून तरुणांचा नागरिकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला ! एकाला अटक

Akola Crime News: खदान पोलिस स्टेशन अंतर्गत मलकापूर येथे रविवार रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान वाढदिवसाचा केक कापण्यावरून वाद झाला. यामध्ये पाच युवक जखमी झाले. यामधील एका युवकावर आरोपींनी चाकूने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

मलकापूर चौकात केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना नागरिकांनी थांबविले. यावरून दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली. याचे रुपांतर हाणामारीत होवून प्राणघातक हल्ले झाले. यानंतर यातील काही युवकांनी मलकापूर येथील नागरिकांवर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला चढविला. एसडीपीओ सुभाष दुधगावकर, खदान पोलिसांचे एसएचओ धनंजय सायरे पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. यांनतर परिस्थिती नियंत्रणात आली.

दरम्यान, गंभीर जखमी युवकाला त्वरित सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. ही घटना जुन्या वादातून घडल्याचेही बोलल्या जात आहे. या घटनते शुभम शांताराम वानखडे (२८), अमित सुनील गोपनारायण (२९), राजू प्रभाकर गोपनारायण (३६), पवन मोहन गोपनारायण (२७), हिरा कांबळे (सर्व रा. मलकापूर) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी खदान पोलिसांनी एका युवकाला ताब्यात घेतले असून, इतरांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा

अकोला येथील मलकापूर भागात रविवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याबाबत निषेध करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला. हल्ल्यातील आरोपींना तत्वरीत अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली. (Latest Marathi News )

Akola Crime: रस्त्यावर केक कापण्यापासून रोखलं म्हणून तरुणांचा नागरिकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला ! एकाला अटक
Police Patil Bharti: ४७६ गावांना मिळणार पोलीस पाटील ! 'या' ५ तालुक्यांत दहा वर्षांनंतर होणार भरती

घटनेनंतर शहरातील फलक हटविले

मलकापूर परिसरात झालेल्या घटनेनंतर पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने शहरात लावण्यात आलेले सर्व फलक, बॅनर आणि होर्डिंग हटविण्यात आले. महापालिका अतिक्रमण विभागासोबत मिळून पोलिसांच्या उपस्थितीत हे फलक हटविण्यात आले. (Latest Marathi News )

Akola Crime: रस्त्यावर केक कापण्यापासून रोखलं म्हणून तरुणांचा नागरिकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला ! एकाला अटक
Women Fashion: आईच्या जुन्या साडीला मॉडर्न लूक देण्यासाठी फॉलो करा या स्टाइलिंग टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com