अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यात पुन्हा एकदा हनीट्रॅपच्या (Akola Honey Trap Case) माध्यमातून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 52 वर्षीय सराफ व्यावसायिकाला खोट्या बलात्कार प्रकरणात अडकविण्याची धमकी देत एका दाम्पत्यानं तब्बल 18 लाख 74 हजार रुपयांची खंडणी उकळली. मात्र, अखेर पोलिसांनी (Police) सापळा रचून आरोपींना पैसे घेताना रंगेहात पकडलं.